कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिस्तबद्ध सीमोल्लंघन मिरवणुकीसाठी प्रयत्न करणार

06:33 AM Sep 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र महोत्सव महामंडळाच्या बैठकीत चर्चा

Advertisement

 प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बेळगाव शहरात मोठ्या उत्साहात विजयादशमी दिवशी सीमोल्लंघन मिरवणूक काढली जाते. या मिवणुकीमध्ये शहरातील विविध समाज व मंदिरांच्या पालख्या एकत्रित येतात. या मिरवणुकीला शिस्त आणण्यासोबत सर्व नागरिकांना सीमोल्लंघन पाहता यावे, यादृष्टीने नियोजन करण्यासंदर्भात शनिवारी जत्तीमठ येथे मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

ज्योती कॉलेजच्या मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम होतो. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पालख्यांचे दर्शन घेणे शक्य होत नाही. यासाठी यावर्षी प्रत्येक पालखीला प्लॅटफार्म तयार करून दिला जाणार आहे. यामुळे नागरिकांना दर्शन घेणे सोयीचे होईल, असे रमाकांत कोंडूसकर यांनी सांगितले. याबरोबरच शहरातील दुर्गादेवी मंडळांकडून आपल्या समस्या मांडण्यात आल्या. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले.

बैठकीला मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, आनंद आपटेकर, दत्ता जाधव, अजित कोकणे, परशुराम किणेकर, सुरेश पिसे, मल्लेश चौगुले, प्रमोद बिर्जे, आनंद पुजारी, सुधीर मोरे,

दीपक खटावकर, बळवंत शिंदोळकर, सुनील बोकडे, अंकुश केसरकर, किरण हुद्दार यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article