महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चन्नेवाडी शाळा सुरू होण्याच्या हालचाली

10:21 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्रामस्थांनी घेतली गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट, निवेदन सादर : आठ वर्षांपासून शाळा बंदच

Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

गेल्या सात ते आठ वर्षांपासून बंद असलेल्या चन्नेवाडी (ता. खानापूर) येथील मराठी शाळा सुरू करण्याच्या पालकांच्या व गावकऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश येताना दिसून येत आहे. मंगळवारी गावकरी मंडळी व पालकांनी खानापूर गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांची भेट घेऊन शाळा सुरू करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन सादर केले. तत्कालीन शिक्षकांच्या सोयीस्कर वागण्यामुळे शाळा कशी बंद पडली व त्यानंतर गावातील विद्यार्थ्यांची शाळेअभावी कशी गैरसोय झाली याची संपूर्ण माहिती राजश्री कुडची यांना देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपूर्वी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही शाळेला भेट देऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानंतर गावकऱ्यांनी पाठपुरावा करत गट शिक्षणाधिकारी यांना गावकऱ्यांच्या व पालकांच्या सह्यांचे निवेदन देऊन आमदारांशी संपर्क साधला. या मागणीला व पाठपुराव्याला यश येताना दिसत असून आजच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ व सद्यपरिस्थितीत प्रति शिक्षकांची नियुक्ती करण्यासंदर्भात जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून तात्काळ कार्यवाही करू, असे आश्वासन गट शिक्षणाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी ग्रामस्थ विठ्ठल पाटील, मुरलीधर पाटील, धनंजय पाटील, सुधाकर पाटील, शंकर पाटील, दत्ताराम पाटील, उदय पाटील व पालक हजर होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article