महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सागर संशोधनावर प्रकाश टाकण्याचे प्रयत्न

06:50 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रत्नागिरीमध्ये सागरी विज्ञान केंद्रस्थानी ठेऊन महोत्सव घेण्यात आल़ा  यात अनेक मान्यवर सहभागी झाले होत़े कदाचित मर्यादित श्रोत्यांसमोर तज्ञांनी आपले विषय ठेवले तरी त्या अभ्यास मुद्यांची परीणामकारकता खोलवरची आह़े सागरी विज्ञान हा विषय केवळ किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांशी संबंधित नसून सर्वच लोकांशी तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपाने संबंधित आह़े  त्यातल्या त्यात गवसणाऱ्या नव्या वाटा आणि जैवविविधतेचा शोध हे उपकारक ठरणारे आहे, हे परिषदेमुळे अधोरेखित झाल़े

Advertisement

आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात रत्नागिरी येथे दुसरा सागरी महोत्सव जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडल़ा नौदल, तटरक्षक दल सागरी पोलीस संरक्षण करत आहेत. पूर्वीपासून भारतीयांना समुद्री व्यापाराची उत्तम माहिती, ज्ञान होते. परंतु इंग्रजांच्या काळात हे ज्ञान आपण विसरलो, आता ते पुन्हा आठवूया व प्रत्येकाने योगदान देऊया. या साऱ्यातून भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन होणार आहे, त्यासाठी सागरी विज्ञानाचा उपयोग करुन घेतला पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय नौसेनेचे कमोडोर श्रीरंग जोगळेकर (निवृत्त) यांनी केले. या सागर महोत्सवाच्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुरेश नाईक, एनआयओ संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. नरसिंह ठाकूर, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन उपस्थित होते. महोत्सवासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयासह राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडिया, कोस्टल कॉन्झर्वेशन फाउंडेशन यांचे सहकार्य लाभल़े

Advertisement

भारतीय नौसेनेच्या युद्धनौका व पाणबुडीची लाकडापासून बनवलेली मॉडेल्स या महोत्सवात ठेवण्यात आली होत़ी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह रत्नागिरीकरांनीही ही मॉडेल्स पाहिल़ी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निसर्ग फेरीत रत्नागिरी समुद्र किनारी सरगॅसम, शेल बायंडर वर्म, सॅंड बबलर क्रॅबनी वाळूत केलेली बिळं, घोस्ट क्रॅब जिज्ञासूंना पाहायला मिळाले.

सागर महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि मान्यवरांना कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील सागरी प्रदेशातील विषयाआधारित लघुपट दाखवण्यात आले. याखेरीज व्याख्यानांच्या माध्यमातूनदेखील सागरी जैवविविधतेची उपयोगिता तिचे अस्तित्व मान्यवरांनी विशद केले. महोत्सवात ‘शोध समुद्री गोगलगायींचा व ठेवा दुर्मीळ कांदळवनांचा’ या विषयावर लघुपट दाखवण्यात आले. या महोत्सवामध्ये सागरी क्षेत्रात वापरण्याचे रोबोटीक्स यासंदर्भात प्रकाश टाकण्यात आला. प्रगत होणारे अभियांत्रिकी तंत्रज्ञान अन्य क्षेत्रात म्हणजे सागरी विज्ञान क्षेत्रात वापरण्याविषयीचा मुद्दा वैज्ञानिकांसमोर आला आह़े राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमध्ये यावर प्रयोग सुरु आहेत़ त्याची झलक या महोत्सवामध्ये लोकांसमोर ठेवण्यात आल़ी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संशोधक नृसिंह ठाकूर यांनी याविषयी तपशीलात माहिती दिल़ी

समुद्राला अथांग म्हटले जाते म्हणजे सहजासहजी त्याचा थांग लागत नाह़ी समुद्राच्या पोटात अनेक बाबी अशा आहेत की, तेथपर्यंत मानव अद्याप पोहोचलेला नाह़ी अनेक बाबींपर्यंत संशोधकांना पोहोचणे शक्य झाले नाह़ी विज्ञानाच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रगतीचा लाभ काहीशा दुर्गम असलेल्या समुद्र विज्ञान क्षेत्रात वापरण्याचा मुद्दा निश्चितच आश्वासक आह़े समुद्राच्या पोटात अनेक खनिज त्याचबरोबर वनस्पती व जीव वैविध्य दिसून येत़े त्याचा अभ्यास जितक्या चांगल्या प्रकारे करता येईल तितक्या चांगल्या प्रकारे मानवी जीवनात अधिक सौख्य प्राप्त होईल, अशी अपेक्षा शास्त्रज्ञ बाळगून आहेत़ काही वनस्पतींपासून औषधांची निर्मिती होऊ शकते तर काही जीव नव्याने समोर येऊ शकतात़ समुद्र विश्वाचे न समोर आलेले मुद्दे पुढे आणण्यासाठी सी रिबोटीक्स तंत्राचा मोठा उपयोग होईल़ अधिक गतीने या शास्त्राची प्रगती होईल़ समुद्राखालचा बराच भाग कायमचा अंधारात असत़ो या अंधाऱ्या विश्वात कितीतरी जलचर आणि वनस्पती जीवन जगत आहेत़ त्यावरही प्रकाश टाकण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल़ सागरी विज्ञानाकडे आव्हानात्मक शाखा म्हणून पाहिले जात़े कारण सागरापर्यंत पोहोचणे आणि त्यातील विविध गोष्टींचे नमुने मिळवणे हे सहज सोपे नसत़े त्यामुळे शास्त्रज्ञांना विशेष अभियान हाती घेउढन नमुने मिळवावे लागतात़ कित्येकदा पाणबुडी व अन्य साधने वापरावी लागतात़ काही प्रसंगात मानवी पाणबुडे मंडळींची मदत घ्यावी लागत़े म्हणून या शास्त्राची प्रगती धिम्या गतीने होत आह़े ही प्रगती अधिक वेगाने होण्यासाठी रोबोटीक्सचे तंत्र उपयोगी ठरेल़, अशी अपेक्षा वरिष्ठ वैज्ञानिक व्यक्त करत आहेत़

महाविद्यालयांच्या मते होणाऱ्या परिषदांचा नेमका उपयोग काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत़ो महाविद्यालयांच्या स्तरावर शिकवणारे प्राध्यापक आणि शिकणारी मुले ही परिषदांचे थेट संबंधी आहेत़ तरी याशिवाय अनेक लाभ परिषदांमध्ये होत असतात़ वर्षानुवर्षे खर्च करुन शास्त्रज्ञांनी अनेक निष्कर्ष काढलेले असतात़ ते परिषदांमुळे सर्वांसमोर ठेवणे शक्य होत़े उच्च दर्जाचे शास्त्रज्ञ परिषदांच्यावेळी उपस्थित राहत असल्यामुळे विद्यार्थी वर्गासाठी ही उपस्थिती प्रेरणादायी ठरत़े आपण देखील शास्त्रज्ञ व्हावे ही भावना विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागण्यासाठी परिषदांचा नक्कीच उपयोग होत़ो समुद्री विज्ञान हा विषय विशिष्ट क्षेत्राशी संबंधित असला तरी सर्वसामान्याला हितकारक असे कितीतरी मुद्दे संशोधनाअंती तयार होतात़ संशोधनाचा लाभ लोकांना सर्वदूर होत असत़ो म्हणून या परिषदा महत्त्वाच्या आहेत़

विद्यापीठ अनुदान आयोगापासून अनेक सरकारी व्यवस्था विशिष्ट विषयांसाठी घेतल्या जाणाऱ्या परिषदांना पाठिंबा देत असतात़ नुकत्याच रत्नागिरीत पार पडलेल्या परिषदेला शासन बाह्य संस्थेकडून खूप मोठे पाठबळ मिळाले, अशा संस्था पुढे याव्यात़ त्यामुळे शिक्षण क्षेत्रात नवे मैलाचे दगड उभे राहतील़ पुढच्या विद्यार्थ्यांसाठी झालेले काम मार्गदर्शक ठरेल यात शंका नाह़ी

 

सुकांत चक्रदेव

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article