मत्स्योद्योग क्षेत्राला स्वयंपूर्ण करण्याचे प्रयत्न : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : ‘अॅक्वा गोवा फिश फेस्टिवल’ची जनजागृती सुरु
पणजी : ‘विकसित गोवा 2047’ चे ध्येय साध्य करण्यासाठी मत्स्योद्योग क्षेत्राला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मत्स्योद्योग क्षेत्रात परंपरेसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. येत्या दि. 10 पासून कांपाल येथे होणाऱ्या ‘अॅक्वा गोवा फिश फेस्टिवल’ ची जागृती करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या वाहनाला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. गुऊवारी पर्वरी येथे आयोजित या कार्यक्रमास त्यांच्यासोबत मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्dयामंत्र्यांनी, किनारी प्रदेशातील राज्य असल्याने गोव्याला ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ द्वारे विकासित करण्याची संधी आहे. त्यासाठी अधिकाधिक तऊणांनी या क्षेत्रात भविष्य घडवावे, असे आवाहन केले. ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजेच नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम मत्स्यसंपदा सारख्या विविध योजना आणल्या आहेत. ब्ल्यू इकॉनॉमीचे ध्येय साध्य करण्यासाठी एनआयओ सारख्या संस्थांमधील संशोधन उपयुक्त ठरू शकते, असे ते म्हणाले. ‘अॅक्वा गोवा फिश फेस्टिवल’मध्ये तऊणांना ब्ल्यू इकॉनॉमीबद्दल अधिक माहिती दिली जाणार आहे. तसेच विविध प्रकारचे मासे पाहण्यास मिळणार आहेत. त्याशिवाय खाद्य पदार्थांचे स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे यांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शालांत परीक्षांमुळे जानेवारीत महोत्सव : हळर्णकर
दरवर्षी हा महोत्सव फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात येत होता. यंदा शालांत परीक्षांमुळे तो जानेवारीत करण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री हळर्णकर यांनी दिली. महोत्सवात या क्षेत्रातील तज्ञांकडून बी-टू-बी सत्र तसेच क्षेत्रातील विविध योजनांची माहिती आणि संधींबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे हळर्णकर यांनी पुढे सांगितले.