For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यार्थ्यांच्या पटसंख्या वाढीसाठीचे प्रयत्न

11:08 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
विद्यार्थ्यांच्या पटसंख्या वाढीसाठीचे प्रयत्न
Advertisement

विविध मोफत सुविधांसह अतिथी शिक्षकांचीही भरती

Advertisement

बेळगाव : नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून शाळांमध्ये पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांकडून प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी स्टुडंट अटेंडन्स ट्रॅकिंग सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये नोंद झाल्याप्रमाणे 6 लाख 64 हजार 387 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांची नोंदणी लवकरच पूर्ण केली जाणार आहे.सरकारी शाळांमधील पटसंख्या टिकविण्याची मोठी जबाबदारी शिक्षक, मुख्याध्यापक तसेच अधिकाऱ्यांवर आहे. यासाठी मे महिन्याच्या उन्हाळी सुटीपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत.

6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जावे, यासाठी सरकारी शाळांपर्यंत विद्यार्थ्यांना आणले जात आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 3 लाख 36 हजार 965 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी 2 लाख 88 हजार 374 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. बेळगाव शहरात 90.57, बेळगाव ग्रामीण 81.54, खानापूरमध्ये 84.45 टक्के नोंदणी झाली आहे. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 4 लाख 37 हजार 72 नावनोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 3 लाख 76 हजार 13 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

Advertisement

विशेष शिकवणीची सूचना

शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने अतिथी शिक्षकांची नेमणूक सुरू केली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये 1457 तर हायस्कूलमध्ये 291 अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना विशेष शिकवणी देण्याची सूचना शिक्षण विभागाने केली आहे.

विविध उपक्रम

सरकारी शाळांमध्ये मुलांची पटसंख्या वाढावी, यासाठी शिक्षण विभाग विविध उपक्रम राबवित आहे. पालकांची बैठक बोलावणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी, शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यापुस्तके पोहोचविण्यात आली असून इतर सुविधाही लवकरच दिल्या जाणार आहेत.

- मोहनकुमार हंचाटे (प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी)

Advertisement
Tags :

.