For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पार्किंगच्या माध्यमातून महसूल वाढीची धडपड

07:13 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पार्किंगच्या माध्यमातून महसूल वाढीची धडपड
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डने रेल्वेस्टेशनसमोरील बसस्थानकासह इतर पार्किंगसाठी निविदा मागवल्या आहेत. जुन्या कंत्राटाची मुदत संपल्याने कॅन्टोन्मेंटने आता नव्या निविदा मागवल्या आहेत. पार्किंगच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंट महसूल वाढीसाठीचा प्रयत्न करीत आहे.

शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी कॅन्टोन्मेंटकडून ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत. कॅटल मार्केटच्या आतील शेड व दुकाने यांना सोडून इतर जागेसाठी तसेच आरटीओ रोड, कलादगी रोड येथील दोन्ही बाजूंना पार्किंगसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नॉर्थ टेलिग्राफ रोड, न्यू हेडपोस्ट ऑफिस रोड, रेल्वेस्टेशनसमोरील दोन्ही बाजूंचे रस्ते, रेल्वेस्टेशन बसस्टँड, बी.सी. 147 च्या परिसरातील

Advertisement

पार्किंगचे शुल्क वसूल केले जाणार आहे.

7 ऑगस्टपासून या निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार असून इच्छुकांना 17 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. कॅन्टोन्मेंटमधील खुल्या व रस्त्याबाजूच्या जागांवर पार्किंग शुल्क लावून महसूल वाढीसाठीचा प्रयत्न कॅन्टोन्मेंटकडून सुरू आहे.

Advertisement
Tags :

.