कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बीडीसीसी बँक निवडणूक अविरोध होण्यासाठी प्रयत्न

12:26 PM Sep 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचा पुढाकार : विविध ठिकाणी बैठका

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (बीडीसीसी) निवडणूक अविरोध होण्यासाठी आमदार व बेमुलचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. बैठका घेऊन निवडणूक अविरोध करण्याबाबत चर्चा सुरू आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये खानापूर तालुका मतदारसंघातून उमेदवाराची निवड करण्याबाबत आमदारांशी व विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, विधानपरिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्याशी चर्चा केली.

Advertisement

19 ऑक्टोबर रोजी बीडीसीसी बँकेची निवडणूक होणार असून 16 पैकी किमान 12 जागांवर विजय मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मतदारसंघांना आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी भेट देऊन प्रचारसभा घेतल्या आहेत. शक्य होईल तितक्या जागा अविरोध निवडून आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. खानापूर तालुका मतदारसंघातून यावेळी अविरोध निवडीची अपेक्षा व्यक्त करून विद्यमान संचालक व माजी आमदार अरविंद पाटील यांची अविरोध निवड करण्यासाठी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याशी चर्चा चालविली आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले हट्टीहोळी यांना माघार घेण्यास मंत्री सतीश जारकीहोळी व आमदार भालचंद्र जारकीहोळी यशस्वी ठरले आहेत.

अपक्षपणे होणाऱ्या या निवडणुकीत आपल्या नेतृत्वातील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आमदार भालचंद्र जारकीहोळी पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधत आहेत. भालचंद्र जारकीहोळी यांच्यात नैतीक स्थैर्य निर्माण करण्याचे काम नेतेमंडळींकडून सुरू आहे. अरविंद पाटील यांची अविरोध निवड करण्यासाठी अनुकूल व्हावे यासाठी इच्छुकांचे मन परिवर्तन करण्यात भालचंद्र जारकीहोळी यशस्वी होतील, अशी सुचिन्हे आहेत. बेळगावातील हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला खानापूर ब्लॉक भाजप अध्यक्ष बसवराज साणिकोप्प, नेते प्रमोद कोचेरी, संजय कुबल, धनश्री सरदेसाई, तसेच खानापूर तालुक्यातील विविध पीकेपीएसचे अध्यक्ष उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article