For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावमध्ये आयटी हबसाठी प्रयत्न करावेत

10:31 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावमध्ये आयटी हबसाठी प्रयत्न करावेत
Advertisement

टेक्नॉलॉजी कंपनी असोसिएशनतर्फे खासदारांकडे मागणी

Advertisement

बेळगाव : बेळगाव टेक्नॉलॉजी कंपनी असोसिएशनच्यावतीने उद्योजकता आणि तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअपच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले जात आहेत. बियाँड बेंगळूर या अंतर्गत बेळगावमध्ये टेक्निकल हब सुरू करण्याची मागणी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सरकारने आयटी पार्कसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच त्याच्या विकासासाठी प्रयत्नशील रहावे. बेळगावमध्ये अनेक आयटी माध्यमांमध्ये काम करणारे लोक असून बेळगावमध्येच आयटी कंपनी सुरू करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून केली जात आहे. बेळगाव शहर हे देशातील विकसनशील शहर असल्याने येथे अनेक सुविधा उपलब्ध आहेत. अनेक इंजिनिअरिंग कॉलेजीस असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खासदारांकडे करण्यात आली.

Advertisement
Advertisement
Tags :

.