कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘एनडीआरएफ’च्या कायमस्वरुपी तळासाठी प्रयत्न

03:41 PM May 31, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

पालकमंत्री उदय सामंत यांनी तब्बल 2 तास अतिशय सुक्ष्मपणे आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक घेतली. ‘एनडीआरएफ’चा कायमस्वऊपी तळ रत्नागिरीत करण्याच्या दृष्टीकोनातून प्रस्ताव तयार कऊन पाठपुरावा करावा. त्यासाठी जागा दिली जाईल, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.

Advertisement

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीस आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिह्यात झालेला पाऊस, शेती, घर, गोठ्यांचे झालेले नुकसान, मनुष्यबळ हानी, प्रशासनामार्फत करण्यात आलेली मदत, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, महावितरण, धरणांची सद्यस्थिती, खते, बी-बियाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, धोकादायक शाळा, अंगणवाडी नुकसान, पाणीपुरवठा, नद्यातून गाळ काढणे, औषधसाठा, आरोग्य सुविधा, साकव, नगरपालिका प्रशासन, पोलीस विभाग या बाबतचा बारकाईने आढावा घेतला.

पालकमंत्री सामंत म्हणाले, 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने मदतीची कार्यवाही करावी. आरोग्य विभागाने साथीचे रोग, स्नेक बाईट या बाबत औषधाचा साठा पुरेपूर राहिल, याची जबाबदारी घ्यावी. प्रलंबित शवविच्छेदन अहवाल तातडीने द्यावेत. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. टाळाटाळ आढळून आल्यास अथवा कोणीही गैरव्यवहार करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही.

कोकण रेल्वेने सर्व रेल्वेस्टेशन स्वच्छ ठेवली पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्या छतावरील गळके पत्रे तातडीने बदलले पाहिजेत. त्या बाबत कार्यवाही करावी. एसटी विभाग नियंत्रकांनीही बसस्थानके स्वच्छ राहतील. विशेषत: स्वच्छतागृहे निटनेटकी राहतील, याची खबरदारी घ्यावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मनावर घेऊन काम करावे. रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची दुऊस्ती, चिखलाची साफसफाई करावी, नवीन पत्र्यांचा वापर कऊन तात्पुरती पिकअप शेड उभी करावीत, महावितरणने वाड्यांचा सर्वे कऊन सिंगल फेजवऊन थ्री फेजवर करण्याबाबत मिशन हाती घ्यावे. धरण लाभ क्षेत्रात किती लोक राहतात, आपत्कालीन परिस्थितीत कितीजणांचे स्थलांतर करावे लागेल, या बाबत नियोजन आतापासूनच करावे. दरडप्रवण क्षेत्राबाबतचेही नियोजन असावे. चांगल्या शाळा निवारा म्हणून वापरता येतील. त्याची तयारी करावी, असा सूचना मंत्री उदय सामंत यांनी केल्या.

अतिधोकादायक, धोकादायक शाळांची यादी करा. त्या बाबतचा अहवाल द्या. दुऊस्तीसाठी प्राधान्य दिले जाईल. कृषी विभागाने शेतकऱ्याच्या बांधावर बियाणे आणि खते देण्यासाठी यंत्रणा राबवावी. त्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी, असेही पालकमंत्री म्हणाले. अधिकाऱ्यांनी फोन उचलले पाहिजेत. इथून पुढे 4 महिने सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांनी सतर्क रहायला हवे. अत्यावश्यक कारणांशिवाय आपत्कालीन परिस्थितीत रजेवर जाऊ नये तसेच मुख्यालय सोडू नये. बरेच अधिकारी फोन उचलत नाहीत. गायब असतात. अशांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांनी आलेला फोन उचलला पाहिजे, असेही पालकमंत्री म्हणाले

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article