महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तरुणांमध्ये देशभक्तीची बिजे रुजविण्याचा होतोय प्रयत्न

10:13 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मराठा लाईट इन्फंट्रीचा उपक्रम

Advertisement

बेळगाव : आजच्या युवा पिढीमध्ये देशभक्तीची भावना रुजवून भारतीय सैन्यात सहभागी होण्याची प्रेरणा देण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावतर्फे आयटीआय कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भारतीय सैन्याविषयी माहिती देऊन सैन्यात दाखल होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. भारतीय सैन्याने जगभरात नाव कमावले असून यामध्ये अधिकाधिक तरुण सहभागी होण्यासाठी सैन्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक तरुणांना सैन्यात भरती कसे व्हावे? कशी सेवा बजावावी? अग्निपथ योजना म्हणजे काय? या विषयी पुरेशी माहिती नाही. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये जाऊन मराठा लाईट इन्फंन्ट्रीतर्फे अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. कर्नाटक आयटीआय कॉलेजमध्ये लष्करी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना माहिती देऊन सैन्यात भरती होण्याचे आवाहन करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article