For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वसामान्य व्यावसायिकांच्या अर्थकरणावर परिणाम

06:22 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वसामान्य व्यावसायिकांच्या अर्थकरणावर परिणाम
Advertisement

एलपीजी गॅस दरात 50 रुपयांची वाढ,  व्यावसायिकांचे बजेट कोलमडले

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. त्यामुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. ही दरवाढ 1 मार्चपासून लागू करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात बदल केला असून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

Advertisement

दैनंदिन वस्तुंच्या दरात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. अशातच एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाल्याने व्यावसायिकांवर आर्थिक भार वाढला आहे. विशेषत: व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने फटका सहन करावा लागत आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलिंडर दरात वाढ झाल्याने   रेस्टॉरंट, हॉटेल आणि इतर व्यावसायिकांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या दरात वाढ होणार आहे.

गतवर्षी रशिया-युक्रेन युद्धादरम्यान व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती भडकल्या होत्या. 2200 रुपयांपर्यंत गॅस सिलिंडरच्या किमती गेल्या होत्या. मात्र आता व्यावसायिकांना प्रतिसिलिंडरमागे जादा 50 रुपये मोजावे लागणार आहेत. आधीच महागाईने कहर केला आहे. त्यातच व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य व्यावसायिक कचाट्यात सापडले आहेत.

Advertisement
Tags :

.