For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेदरलँड्स संघाचे नेतृत्व एडवर्डसकडे

06:25 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
नेदरलँड्स संघाचे नेतृत्व एडवर्डसकडे
Advertisement

वृत्तसंस्था/ अॅमस्टरडॅम

Advertisement

1 जूनपासून अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी नेदरलँड्स संघाची घोषणा करण्यात आली. नेदरलँड्स क्रिकेट संघटनेने या स्पर्धेसाठी अनुभवी स्कॉट एडवर्डसकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

अलिकडेच झालेल्या तिरंगी टी-20 स्पर्धेत नेदरलँड्स संघाचे नेतृत्व 27 वर्षीय एडवर्डसकडे होते. या तिरंगी स्पर्धेत यजमान नेपाळ आणि नामिबिया यांचा समावेश होता. स्कॉट एडवर्डसने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 56 सामन्यात नेदरलँड्सचे प्रतिनिधीत्व करताना 671 धावा जमविल्या आहेत. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या नेदरलँड्स संघामध्ये भारतीय वंशाच्या एन. तेजा, विक्रमसिंग आणि आर्यन दत्त या तीन क्रिकेटपटूंचा समावेश आहे. नेदरलँड्स संघाने यापूर्वी 2022 च्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तर गेल्य वर्षी झालेल्या भारतातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नेदरलँड्सचा सलामीचा सामना 4 जून रोजी नेपाळ विरुद्ध होणार आहे.

Advertisement

नेदरलँड्स संघ - स्कॉट एडवर्डस (कर्णधार), आर्यन दत्त, बेस डिलेडी, डॅनियल डोरेम, फ्रेड क्लासेन, कायली क्लिन, लोगान व्हॅन बेक, मॅक्स ओ दाऊद, मिचेल लेव्हिट, पॉल व्हॅन मिकेरीन, एस. इंजेलब्रेट, एन. तेजा, टीम प्रिंगल, विक्रमसिंग आणि वेस्ले बॅरेसी.

Advertisement
Tags :

.