For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : बड्स इंटरनॅशनल स्कूलच्या 45 विद्यार्थ्यांची इस्रोला शैक्षणिक भेट

05:14 PM Dec 02, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur news   बड्स इंटरनॅशनल स्कूलच्या 45 विद्यार्थ्यांची इस्रोला शैक्षणिक भेट
Advertisement

                   कोल्हापूर विद्यार्थ्यांना इस्त्रो केंद्रात अवकाशशास्त्राचे अनोखे मार्गदर्शन

Advertisement

कोल्हापूर :  आर. एल. तावडे फाउंडेशन संचलित बड्स इंटरनॅशनल स्कूलच्या ४५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बंगळुरूमधील इस्त्रोच्या अंतरिक्ष केंद्रास शैक्षणिक भेट दिली.

इस्त्रो केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मंजू सुधाकर, शास्त्रज्ञ शिवमत्रिवेदी, शास्त्रज्ञ मयुख मुखर्जी, शास्त्रज्ञ नागेश्री मोहनकुमार यांनी अवकाश, उपग्रह, रॉकट्स, चांद्रयान याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी इसरोचे जनरल मॅनेजर मा. हेब्बर रामचंद्रा यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी अवकाश रॉकेट्स विषयावर प्रश्नमंजुषा घेतली होती.

Advertisement

स्कूलच्या प्रितम घोडके, तृप्ती पाटील, मनीषा पाटील या विद्यार्थ्यांबरोबर गेलेल्या शिक्षकांना अवकाश विषयक पुस्तके, रॉकेटची प्रतिकृती सन्मानित देऊन करण्यात आले. विद्यार्थ्यांना बड्स स्कूलच्या संस्थापिका शोभा ताबडे, प्राचार्या उर्मिला शिंदे, आशा आनंद, अॅ डमिनिस्ट्रेटर प्रतिभा सापळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement
Tags :

.