For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रम

10:42 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रम
Advertisement

बेळगाव : मराठी भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी युवा म. ए. समितीकडून राबविण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. स्पर्धेच्या युगामध्ये मराठी भाषिक तरुणांना स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे ज्ञान घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. युवा समितीतर्फे बालबोधिनी अंकलपी प्रकाशन व शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करुन ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, प्रशांत इनामदार, नगरसेवक शिवाजी मंडोळकर उपस्थित होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी युवा समितीकडून राबविलेले उपक्रम गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणारे आहेत. आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिल्यास ते ज्ञान अधिक काळ टिकणारे आहे. मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. याबरोबरच इतर भाषांचेही ज्ञान घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रशांत इनामदार, अध्यक्ष अंकुश केसरकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीकांत कदम यांनी केले. यावेळी युवा समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.