महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अरविंद केजरीवालांना ईडीचे पाचवे समन्स

06:27 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मद्य धोरणप्रकरणी 2 फेब्रुवारीला चौकशी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना 2 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली आहे. यापूर्वी, ईडीने चार समन्स जारी केले होते. मात्र, चारही वेळा अरविंद केजरीवाल तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत.

मद्य घोटाळ्यातील प्रकरणात ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 18 जानेवारी रोजी चौथ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. त्यापूर्वी तिसरे समन्स 3 जानेवारीला बजावण्यात आले होते. तसेच पहिले समन्स 2 नोव्हेंबर 2023 रोजी आणि दुसरे समन्स 21 डिसेंबर 2023 ला पाठवत अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. चारही समन्समध्ये ते तपास यंत्रणेसमोर हजर झाले नसल्याने आता त्यांना पाचवे समन्स पाठविण्यात आलेले आहे.

दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरण घोटाळा 2021-22 मधील अबकारी धोरणाशी संबंधित आहे. याप्रकरणी मनीष सिसोदिया आणि संजय सिंह सध्या तुऊंगात आहेत. मनीष सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरोने गेल्या वषी फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. त्यानंतर संजय सिंह यांना याच प्रकरणातील मनी लाँड्रिंगशी संबंधित आरोपांवरून 4 ऑक्टोबर रोजी अटक केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article