For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईडीची स्वत:च्या अधिकाऱ्यावर कारवाई

06:03 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
ईडीची स्वत च्या अधिकाऱ्यावर कारवाई
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

तामिळनाडूतील एका प्रकरणात प्रवर्तन निर्देशालयाने (ईडी) स्वत:च्याच अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. ईडीच्या विशेष कृती दलाने मदुराई येथील स्वत:चा अधिकारी अंकित तिवारी याला अटक केली आहे. त्याच्यावर एका प्रकरणातील आरोपीकडून 20 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

या अधिकाऱ्याला प्रथम दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधी प्राधिकरणाने अटक केली होती. दिंडीगुल येथील एका डॉक्टरकडून त्याने 20 लाख रुपयांची लाच मागितली आणि ती स्वीकारली, असा आरोप आहे. या अधिकाऱ्यावर आता मनी लाँड्रिंगच्या अनुच्छेदांच्या अंतर्गत न्यायालयीन कारवाई होणार आहे. तिवारी याच्यावर तामिळनाडू पोलिसांनीही एफआयआर सादर केला आहे.

Advertisement

पोलीस-ईडी वाद

या प्रकरणातून तामिळनाडू पोलीस आणि ईडी यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. आपला अधिकारी स्वच्छ असल्याचे प्रतिपादन ईडीने आधी केले होते. त्याचप्रमाणे तामिळनाडूच्या दक्षता विभागाला या अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन झडती घेण्यापासून रोखण्यात आले होते. त्यानंतर दक्षता विभागाने मदुराई पोलिसांचे साहाय्य घेतले होते. अखेर ईडीनेच आता आपल्या या अधिकाऱ्याविरोधात कारवाई केली असून त्याच्यावरचे प्रकरण दिल्लीत चालविले जाणार आहे. त्याला लवकरच दिल्लीला आणण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.