ईडीसीकडून आतापर्यंत 14 हजार उद्योगांना मदत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून प्रशंसा
पणजी : गोवा सरकारच्या आर्थिक विकास महामंडळाने (ईडीसी) आदर्शवादी काम करताना राज्याला मदत करण्याबरोबरच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मिळून आतापर्यंत 14 हजार उद्योगांना कर्ज स्वऊपात सहकार्य केले आहे. ईडीसीच्या या कामामुळे सुमारे दीड लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे आणि ही गोष्ट वाखाणण्याजोगीच आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. आर्थिक विकास महामंडळाच्या 50व्या वर्धापनदिनानिमित्त महामंडळाला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ट्वीटरद्वारे शुभेच्छा दिल्या. ईडीसीने कर्जातून तीन लाख अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण केल्या. 2001 पासून आजपर्यंत मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली 8 हजारजणांना कर्ज मंजूर केलेले आहे. गोव्याच्या आर्थिक विकासासाठी ईडीसीने महत्त्वाचे योगदान देण्याबरोबरच शिक्षणासाठीही प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.