महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लालू, तेजस्वी यादव यांना ईडीचे समन्स

06:46 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी पाचारण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे वडील आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांना समन्स बजावले आहे. तेजस्वी यादव यांना 22 डिसेंबर रोजी तर लालूप्रसाद यादव यांना 27 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वेतील नोकरीच्या बदल्यात झालेल्या जमीन घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. दोघांनाही वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या असून त्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना 2004 ते 2009 दरम्यान हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. यामध्ये अनेक लोकांना रेल्वेच्या विविध झोनमध्ये ग्रुप-डी पदांवर नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. या बदल्यात उमेदवारांनी आपली जमीन तत्कालीन रेल्वेमंत्री लालू यादव यांच्या कुटुंबीयांना आणि संबंधित कंपनी एके इन्फोसिस्टमला दिली होती. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह 17 जणांना नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. लोकांकडून घेतलेली जमीन राबडीदेवी आणि मिसा भारती यांच्या नावावरही घेतल्याचे आरोपात म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article