महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केजरीवालांना ईडीचे तिसऱ्यांदा समन्स

06:31 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

3 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. आता 3 जानेवारी 2024 रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी ईडीने त्यांना 21 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार अरविंद केजरीवाल सध्या पंजाबमध्ये विपश्यना केंद्रात पोहोचले असल्याने ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले नव्हते. त्यानंतर आता तिसरे समन्स पाठवण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही केजरीवाल 10 दिवसांच्या विपश्यना ध्यान कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. गेल्या काही वर्षांत विपश्यनेसाठी त्यांनी बेंगळूर आणि जयपूरसह अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. ईडीने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी यापूर्वी 2 नोव्हेंबरलाही नोटीस पाठवली होती, मात्र त्यांनी ही नोटीस बेकायदेशीर ठरवून ती मागे घेण्याची मागणी केली होती. त्याच दिवशी केजरीवाल मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article