For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस नेते धीरज साहूंना ईडीने पाठवले समन्स

07:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस नेते धीरज साहूंना ईडीने पाठवले समन्स
Advertisement

छाप्यांमध्ये सापडले होते 350 कोटी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांना ईडीने गुऊवारी समन्स पाठवले. केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांना शनिवार, 10 फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावले आहे. प्राप्तिकर विभागाने डिसेंबर महिन्यात साहू कुटुंबाने प्रमोट केलेल्या ओडिशा-आधारित बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड (बीडीपीएल) वर छापा टाकून 351.8 कोटी ऊपयांची रोकड जप्त केली होती. ही रोख रक्कम आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती आहे. ईडी अधिकारी धीरज साहू यांची सोरेन आणि बीएमडब्ल्यू एसयूव्हीशी असलेल्या कथित संबंधांबाबत चौकशी करू इच्छित आहे. ही कार अलिकडेच सोरेन यांच्या दिल्लीतील घरातून ईडीने जप्त केली होती. याप्रकरणी ईडीने गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली होती. गुऊग्रामच्या कारदारपूर गावात ईडीने छापा टाकत ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी हरियाणा नोंदणीकृत नंबरप्लेट असलेली स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल जप्त केली होती. याचप्रकरणी बुधवारी कोलकात्यात दोन ठिकाणी झडती घेण्यात आली. हे वाहन कथितपणे साहूशी निनावी मार्गाने जोडल्याचा ईडीला संशय आहे. हेमंत सोरेन (48) यांना ईडीने 31 जानेवारी रोजी कथित बेकायदेशीर भूसंपादन आणि ताब्यात घेण्याच्या प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. औपचारिकरित्या अटक होण्यापूर्वी सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.