ईडीचा बघेल यांच्या निकटवर्तीयाच्या घरी छापा
07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
रायपूर : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे खासगी सचिव राहिलेले के.के. चंद्रवंशी यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. मंगळवारी सकाळी ईडीची टीम चंद्रवंशी यांच्या घरी पोहोचली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडीचे 8 अधिकारी चंद्रवंशी यांच्या जुन्या भिलाई येथील घरी पोहोचले. टीमने घरात दाखल होत दस्तऐवजांची तपासणी सुरू केली. तर छाप्यादरम्यान सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. सीआरपीएफ तसेच स्थानिक सुरक्षा दलाच्या जवानांना तेथे तैनात करण्यात आले. परंतु ईडीची ही कारवाई कोणत्या प्रकरणी करण्यात येत आहे यासंबंधी माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.
Advertisement
Advertisement