महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संदीप घोष यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे

06:07 AM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : निकटवर्तीय प्रसून चटर्जीही ईडीच्या ताब्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या 6 मालमत्तांवर शुक्रवारी ईडीने छापे टाकले. रुग्णालयातील आर्थिक अनियमिततेच्या आरोपावरून ईडीने मनी लाँड्रिंगबाबत ही कारवाई केली. छाप्यानंतर संदीप घोषचा जवळचा सहकारी आणि नॅशनल मेडिकल कॉलेजचा डेटा एन्ट्री ऑपरेटर प्रसून चटर्जी याला ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी याच प्रकरणात सीबीआयने घोष यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली होती. एकीकडे घोष यांच्या मालमत्तांवर ईडीची कारवाई सुरू असतानाच त्यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडूनही झटका बसला. आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील आर्थिक अनियमिततेचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला घोष यांनी आव्हान दिले होते. सदर याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

सकाळी ईडीने बेलियाघाटा येथील घोष यांच्या घरावर आणि हावडा आणि सुभाषग्राम येथील त्यांच्या जवळच्या साथीदारांच्या दोन ठिकाणांवर छापे टाकले. 7 तासांच्या कारवाईनंतर ईडीने संदीप घोषचा निकटवर्तीय सहकारी प्रसून चटर्जीला सुभाषग्रामच्या डी पारा भागातील त्याच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले.

प्रसून चटर्जीही संशयाच्या भोवऱ्यात

9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर संदीप घोष यांचा निकटवर्तीय प्रसून चटर्जी गुन्हेगारीच्या ठिकाणी दिसला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रसून चटर्जी यांच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. व्यवसायाने नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर असतानाही घटनेच्या दिवशी तो आरजी कर हॉस्पिटलमध्ये कसा आणि का गेला, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. शुक्रवारी सकाळपासून सुमारे 7 तास त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. प्रसून चटर्जी आणि संदीप घोष यांच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

प्रसून चटर्जी यांच्या घरावर ईडीचा छापा

दक्षिण 24 परगणा जिह्यातील सुभाषग्राममध्ये प्रसून चटर्जी याचे तीन मजली घर आहे. शुक्रवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झडती घेतली. गेल्या काही वर्षांत प्रसून चटर्जी यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्याचा आरोप परिसरातील लोक करतात. प्रसून चटर्जी स्वत:ला संदीप घोष यांचे पीए मानत होता. तो नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करत असला तरी नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर रजिस्टर बुकमध्ये नाव टाकायचा आणि मग निघून जायचा. घटनेच्या दिवशीही नॅशनल मेडिकल कॉलेजच्या रजिस्टरवर त्यांची सही होती, असा आरोप आहे.

सीबीआय तपासालाही गती

प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या दुसऱ्याच दिवशी संदीप घोष यांनी घटना घडलेल्या खोल्यांच्या नूतनीकरणाचे आदेश दिल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह 9 ऑगस्ट रोजी सकाळी सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. त्यानंतर पुरावे मिटविण्यासाठी घोष यांच्याकडून प्रयत्न झाले असून सीबीआयला संबंधित कागदपत्रे मिळाली आहेत. संदीप घोष यांनी 10 ऑगस्ट रोजी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) सेमिनार हॉलच्या शेजारी असलेल्या खोलीचे आणि शौचालयाचे नूतनीकरण करण्यास सांगितले होते. या परवानगी पत्रावर घोष यांची स्वाक्षरीही आहे.

13 ऑगस्ट रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाने आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणाचा तपास आणि ऊग्णालयातील आर्थिक अनियमितता सीबीआयकडे सोपवली होती. सीबीआयने घोष यांना 2 सप्टेंबर रोजी अटक केली होती. पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने घोष यांना निलंबित केले आहे. 28 ऑगस्ट रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) संदीप घोष यांचे सदस्यत्वही रद्द केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article