For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जॉर्ज सोरोसच्या बेंगळूरमधील संस्थांवर ईडीचे छापे

06:42 AM Mar 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
जॉर्ज सोरोसच्या बेंगळूरमधील संस्थांवर ईडीचे छापे
Advertisement

परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप : आठ ठिकाणी झडती

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

अमेरिकेतील अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी स्थापन केलेल्या खासगी वित्तीय संस्था ‘ओपन सोसायटी फाउंडेशन’ (ओएसएफ) आणि त्यांच्या गुंतवणूक शाखेच्या ‘इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फंड’ (ईडीएफ)विरुद्ध परकीय चलन विनियम कायद्याच्या (फेमा) उल्लंघन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी बेंगळूरमध्ये छापे टाकले.

Advertisement

जॉर्ज सोरोस यांच्या ओएसएफ आणि ईडीएफच्या कार्यालयासह बेंगळूरमध्ये 8 ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करून झडती घेतली, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सोरोस यांच्या दोन्ही वित्त संस्थांनी थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) घेत आहेत. तसेच काही लाभार्थ्यांनी ‘फेमा’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे ईडीने मंगळवारी बेंगळुरात छापे टाकले.

2016 मध्ये गृहमंत्रालयाने ओएसएफला प्राईर रेफरन्स कॅटेगरीत समाविष्ट केले होते. ज्यामुळे त्यांना भारतीय खासगी संस्थांना अनियंत्रित देणग्या देण्यास प्रतिबंधित करण्यात आले होते. मात्र, फेमाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून विदेशातून आणलेला निधी एनजीओंना देण्यात आल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

ओपन सोसायटी फाउंडेशन भारतात 1999 पासून कार्यरत आहे. सुरुवातीला ही संस्था शिष्यवृत्ती देत होती. नंतर अनुदान देण्यास प्रारंभ केला. ही संस्था जगभरात न्याय, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि स्वतंत्र माध्यमे चालविणाऱ्या गटांना साहाय्य करते. अधिकृत आकडेवारीनुसार ओएसएफने 2021 मध्ये भारतात 4,06,000 डॉलर्स खर्च केल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.