For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्राऊन मिनरल कंपनीवर ‘ईडी’चा छापा

02:47 PM May 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
क्राऊन मिनरल कंपनीवर ‘ईडी’चा छापा
Advertisement

कागदपत्रे, डिजिटल वस्तूंसह 67.50 लाख रुपये जप्त

Advertisement

पणजी : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित बहु बँक कर्ज घोटाळा रॅकेट प्रकरणात मेसर्स क्राऊन मिनरल ट्रेडिंग कॉर्पोरेशनशी (सीएमसी) संबंधित गोव्यातील सहा ठिकाणी छापे टाकले आहेत आणि मालमत्तेची कागदपत्रे व डिजिटल उपकरणांसह 67.50 लाख रुपये रोख जप्त केले आहेत. हे प्रकरण कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून पुढे आले असून, तक्रारीत कंपनीने त्यांच्या मडगाव शाखेतून फसवणुकीने 7 कोटी रुपयांची कर्ज सुविधा घेतल्याचा आरोप केला आहे. नंतर हे खाते 6.19 कोटी रुपयांच्या थकबाकीसह अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) बनले. ईडीच्या मते, कच्च्या लोहखनिजाच्या व्यापारात गुंतल्याचा दावा करणाऱ्या या कंपनीचा कोणताही वास्तविक व्यवसाय नव्हता.

ईडीने केलेल्या आरोपानुसार, संशयित आरोपींनी 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अतिरिक्त कर्ज मिळवण्यासाठी मडगाव अर्बन को-ऑप. बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, कर्नाटक बँक, बँक ऑफ बडोदा यांसारख्या अनेक बँकांकडे एकाचवेळी त्याच मालमत्ता गहाण ठेवल्या होत्या. गुह्यातून मिळालेला पैसा लपवण्याच्या कटाचा भाग म्हणून, त्याच मालमत्तांसाठी अनेक विक्रीपत्रे तयार करून विविध बँकांमध्ये सादर करण्यात आल्याचेही तपास अधिकाऱ्यांना आढळून आले. दरम्यान, यापूर्वी ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत भागीदारांशी संबंधित 2.86 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीयीकृत बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयनेही 2022 मध्ये या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.