For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अण्णाद्रमुक नेते विजय भास्कर विरोधात ईडीचे छापे

07:00 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
अण्णाद्रमुक नेते विजय भास्कर विरोधात ईडीचे छापे
Advertisement

वृत्तसंस्था /चेन्नई

Advertisement

केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने गुरुवारी अण्णाद्रमुक नेते आणि तामिळनाडूचे माजी मंत्री सी. विजय भास्कर यांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये 25 ठिकाणी ईडीकडून झडती घेण्यात आली आहे. विजय भास्कर हे अण्णाद्रमुक सरकारमध्ये आरोग्यमंत्री राहिले आहेत. तामिळनाडूच्या पुडुकोट्टई येथील ते पक्षाचे प्रभावी नेते आहेत. 2022 मध्ये तामिळनाडूच्या दक्षता पथकाने विजय भास्कर यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी चौकशी केली होती. दक्षता आयोगाच्या चौकशीच्या आधारावरच ईडीने अण्णाद्रमुक नेत्याच्या विरोधात कारवाई केली आहे. यापूर्वी 2022 मध्ये विजय भास्कर यांच्या विरोधात गुटखा घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. रियल इस्टेट ग्रूप जीसक्वायरच्या चेन्नईतील कार्यालयावरही ईडीने छापा टाकला आहे. ईडीने गुरुवारी झारखंडमध्येही छापे टाकले आहेत. ईडीने राज्यातील काँग्रेस नेते लाल मोहित शाहदेव आणि एका पोलीस अधिकाऱ्याच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. राज्यातील जमीन घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी ईडीला या दोघांच्या विरोधात पुरावे मिळाले आहेत. ईडीने यापूर्वी बुधवारी बिहारमधील राजद आमदार शंभुनाथ सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.