For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आप खासदार अरोडा यांच्या घरी ईडीचा छापा

06:44 AM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
आप खासदार अरोडा यांच्या घरी ईडीचा छापा
Advertisement

वृत्तसंस्था/ लुधियाना

Advertisement

पंजाबच्या लुधियानामध्ये आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजीव अरोडा यांच्या घरी ईडीने सोमवारी छापा टाकला आहे. याचबरोबर फायनान्सर हेमंत सूद यांच्या ठिकाणांवरही ईडीने कारवाई केली आहे. ईडीच्या पथकांनी सोमवारी सकाळी संबंधितांच्या ठिकाणांवर जात झडती घेण्यास सुरुवात केली. हेमंत सूद हे माजी कॅबिनेट मंत्री भारत भूषण आशू यांचे निकटवर्तीय ओत.

धान्य वाहतूक घोटाळ्याप्रकरणी आशु यांचे नाव समोर आल्यावर झालेल्या तपासानंतर हेमंत सूद यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तपासात विदेशी देवाणघेवाणही समोर आली आहे.

Advertisement

आप नेते मनीष सिसोदिया यांनी या कारवाईप्रकरणी मोदी सरकारवर टीका केली आहे. मागील दोन वर्षांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरी छापे टाकले, माझ्या घरी छापे टाकण्यात आले, संजय सिंह आणि सत्येंद्र जैन यांच्यावर निवासस्थानाची झडती घेण्यात आली, परंतु कुठेच काही हाती लागले नाही. तरीही मोदी सरकारच्या यंत्रणा एका मागोमाग एक बनावट गुन्हे नोंद करू पाहत आहेत. आम आदमी पक्षाला नुकसान पोहोचविण्यासाठी भाजप कुठल्याही थराला जाऊ शकतो असा आरोप सिसोदिया यांनी केला.

Advertisement
Tags :

.