रेशन घोटाळ्याप्रकरणी बंगालमध्ये ईडीचा छापा
व्यापाऱ्यांसह अन्न निरीक्षकांच्या मालमत्तेची झडती
► वृत्तसंस्था/ कोलकाता
रेशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या विविध पथकांनी हा छापा टाकला. ईडीच्या पथकांनी रेशन व्यापाऱ्यांची घरे आणि दुकाने, अन्न निरीक्षकांचे निवासस्थान आणि जॉयनगर, देगंगा, कल्याणी आणि बसंती येथील सहकारी बँकेच्या शाखेवर छापे टाकले. कोलकाता येथेही छापे टाकण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
कोट्यावधींच्या घोटाळ्याशी संबंध उघड करण्याच्या उद्देशाने छापे टाकण्यात आले होते. या प्रकरणात राज्याचे माजी अन्न मंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांना गेल्यावषी ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आली होती. जुलैमध्ये याच प्रकरणात ईडीने 10 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात शेख शाहजहान, बाकीबुर रहमान, अनिसूर रहमान आणि बारीक बिस्वास यांच्या घरांचा समावेश होता. हे सर्वजण ज्योतिप्रिया मल्लिक यांच्या जवळचे असल्याचे बोलले जाते.