महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीपासून मुंबईपर्यंत ईडीचे छापासत्र

06:31 AM Mar 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘भूषण स्टील’ची 367 कोटींची मालमत्ता जप्त : मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भूषण स्टील लिमिटेड (बीएसएल) विरुद्ध बँक फसवणूक प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासाचा भाग म्हणून दिल्ली, मुंबई, कोलकाता या शहरांसह ओडिशातील काही शहरांमध्ये 367 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. बनावट संचालकांद्वारे बेनामीदार/शेल कंपन्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांवर ईडीकडून ‘पीएमएलए’ अंतर्गत शनिवारी ही कारवाई करण्यात आली. ईडीने ‘बीएसएल’चे व्यवस्थापकीय संचालक नीरज सिंगल आणि सहयोगींवरही अनेक बनावट कंपन्या स्थापन करून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

‘बीएसएल’शी संबंधित लोकांनी अनेक कंपन्यांचा वापर करून एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पैसे ट्रान्सफर केले. हे पैसे भांडवल, मालमत्तेची खरेदी आणि इतर वैयक्तिक कारणांसाठी गुंतवणुकीसाठी पाठवण्यात आले होते, असे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले होते. त्यानुसार अधिक तपास हाती घेतला असता आर्थिक व्यवहारात अस्पष्टता दिसून आली.

बीएसएलचे प्रवर्तक, संचालक आणि अधिकाऱ्यांनी ‘बनावट’ कागदपत्रे तयार केली आणि लेटर ऑफ व्रेडिटमध्ये (एलसी) सूट देण्यासाठी बँकांना बनावट माहिती देत पैसे त्यांच्या कंपन्यांकडे वळवले. जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड आणि हिंदुस्तान झिंक लिमिटेड यांच्या नावे काढलेल्या बनावट एलसीवर मिळालेल्या निधीचा गैरवापर केला गेला, असे अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे. हा पैसा इतर गट/संबंधित कंपन्यांकडे वळवला गेल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.

‘बीएसएल’चे व्यवस्थापकीय संचालक सिंगल यांना ईडीने जून 2023 मध्ये अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. एजन्सीने कंपनीचे माजी उपाध्यक्ष (बँकिंग) पंकज तिवारी, माजी उपाध्यक्ष (लेखा) पंकज अग्रवाल, माजी मुख्य वित्त अधिकारी नितीन जोहरी, सिंगल यांची बहीण अर्चना मित्तल आणि मेहुणा अजय मित्तल यांना जानेवारीत अटक केली होती. यातील अर्चना मित्तलला जामीन मिळाला आहे तर इतर सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article