महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

20 लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक

06:31 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

तामिळनाडूतील दिंडीगुल येथे एका डॉक्टरकडून 20 लाख रूपयांची लाच घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. शुक्रवार, 1 डिसेंबरला स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली. अंकित तिवारी असे आरोपी ईडी अधिकाऱ्याचे नाव आहे. अंकित तिवारी आपल्या ईडी अधिकाऱ्यांच्या टीमसोबत अनेक लोकांना धमकावत असत. तसेच अंमलबजावणी संचालनालयातील प्रकरण बंद करण्याच्या नावाखाली लाच घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीव्हीएसी (दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालय) अधिकाऱ्यांनी तिवारीला दिंडीगुलमध्ये 20 लाख ऊपयांच्या रोकडसह पकडले. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. अवैध संपत्तीप्रकरणी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावरच  लाचखोरीच्या आरोपात अटक झाल्याची अलिकडच्या काळातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article