महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केजरीवाल यांना ईडीचे सातवे समन्स

07:00 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

26 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली मद्य घोटाळ्यात चौकशीसाठी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सातवे समन्स पाठवले आहे. आता त्यांना सोमवार, 26 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. ईडीने केजरीवाल यांना यापूर्वी सहा समन्स पाठवली असली तरी ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. आता सातवे समन्स जारी झाल्याने अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. मद्य घोटाळ्यात कथित मनी लाँड्रिंगचा संशय व्यक्त होत असून याच प्रकरणात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. यापूर्वी 14 फेब्रुवारीलाही ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते, मात्र सहाव्या समन्सवरही केजरीवाल ईडीसमोर हजर झाले नाहीत. यापूर्वी, गेल्यावषी 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर आणि यावषी 3 जानेवारी, 18 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीला ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article