Robert vadra Controversy रॉबर्ट वद्रा प्रकरणात ईडीचा अहवाल सादर
10:40 PM Jul 11, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
► वृत्तसंस्था नवी दिल्ली
ईडीने हरियाणातील शिकोहपूर जमीन व्यवहारासंबंधी व्यावसायिक रॉबर्ट वद्रा आणि इतरांवरील मनी लाँड्रिंग प्रकरणी न्यायालयाला सद्यस्थिती अहवाल सादर केला. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे पती रॉबर्ट वद्रा यांच्याविरोधात सुरू असलेला तपास गुरुग्राम जिह्यातील मानेसर-शिकोहपूर (आता सेक्टर 83) येथील एका जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित आहे.
Advertisement
यापूर्वी, 15 एप्रिल रोजी एका विशेष न्यायालयाने जुलै 2025 मध्ये दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत वद्रा व इतरांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. आता सद्यस्थिती अहवालानंतर न्यायालय पुढे कोणते निर्देश देते याबाबतची उत्सुकता आहे.
Advertisement
Advertisement