For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेमंत सोरेन यांना ईडी कोठडी! भूखंड घोटाळ्याचा इडीचा आरोप

06:06 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
हेमंत सोरेन यांना ईडी कोठडी  भूखंड घोटाळ्याचा इडीचा आरोप
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 5 दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली आहे. रांचीच्या विशेष ईडी न्यायालयाने हा आदेश दिला. त्यांना बुधवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली होती. त्यांच्या मोठ्या प्रमाणात भूखंड घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने त्यांना अनेकदा समन्स धाडले होते.

गुरुवारी त्यांना रांची येथील विशेष ईडी न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले होते. न्यायालयाने प्राथमिक युक्तीवाद ऐकून त्यांना एका दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली होती. मधल्या काळात सोरेन यांनी आपल्या अटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी त्यांच्या याचिकेवर एक तासभर सुनावणी करण्यात आली होती.

Advertisement

न्यायालयाकडून दिलासा नाही

सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक युक्तीवाद ऐकून घेऊन सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयात आवेदनपत्र सादर करण्याचा आदेश दिला. तसेच अटकेला अंतरिम स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला होता. या काळात शुक्रवारी सकाळी ईडीच्या न्यायालयातही सुनावणी करण्यात येऊन त्यांना पाच दिवसांची कोठडी देण्यात आली. आता ते या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार आहेत.

आरोप काय आहे?

हेमंत सोरेन यांच्यावर रांचीतील सेनेच्या भूमीचा काही भाग बेकायदेशीरित्या ताब्यात घेऊन त्याची अवैधरित्या विक्री केल्याचा आरोप आहे. या व्यवहारात त्यांनी कोट्यावधी रुपये बेहिशेबी पद्धतीने मिळविल्याचा आरोप आहे. या रकमेतून त्यांनी आणखी काही मालमत्त विकत घेण्याचाही आरोप आहे. ईडीने या भूखंडांचे व्यापक सर्वेक्षण पेले असून एकंदर भूमी आठ एकर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सोरेन यांच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.