महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अरविंद केजरीवालांविरोधात ईडीची न्यायालयात तक्रार

07:00 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

समन्सकडे दुर्लक्ष केल्याचा दावा : राऊस एव्हेन्यू न्यायालयात 7 फेब्रुवारीला सुनावणी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) वारंवार समन्स पाठवले जाणे आणि त्याकडे दुर्लक्ष केल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढू शकतात. केजरीवाल यांच्याविरोधात मद्य धोरण प्रकरणी ईडीने शनिवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.  या प्रकरणाची सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार आहे. केजरीवाल यांच्याविरोधाती ईडीने शनिवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात धाव घेतली. पाचवेळा समन्स बजावूनही केजरीवाल हजर झाले नसल्याचा दावा ईडीने केला आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अरविंद केजरीवाल यांना पाचवेळा समन्स बजावले आहे, परंतु ते एकदाही ईडीसमोर हजर झाले नाहीत. याच कारणामुळे समन्सचे पालन न केल्याने मुख्यमंत्र्यांविरोधात ईडी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या खटल्यातील काही युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने उर्वरित युक्तिवाद ऐकून त्यावर विचार करण्यासाठी 7 फेब्रुवारीची तारीख निश्चित केली आहे.

दिल्ली पोलिसांचीही नोटीस, 3 दिवसात मागितले उत्तर

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली असून तीन दिवसांत उत्तर मागितले. शनिवारी पोलिसांचे एक पथक पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांना बराच काळ वाट पाहण्यास लावल्याचे समजते. भारतीय जनता पक्ष (भाजप) आम आदमी पक्षाच्या (आप) आमदारांना आर्थिक आमिष दाखवत असल्याच्या आरोपासंदर्भात दिल्ली पोलीस मुख्यमंत्र्यांना नोटीस देण्यासाठी आले होते. तत्पूर्वी, शुक्रवारी केजरीवाल व्यतिरिक्त, पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे मागण्यासाठी आप मंत्री आतिशी यांच्या निवासस्थानाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपचे दोन्ही नेते आपापल्या निवासस्थानी उपस्थित नव्हते. ‘ऑपरेशन लोटस 2.0’ या मोहिमेद्वारे भाजपने निवडून आलेले दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला होता. गेल्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना आप नेत्या आतिशी यांनी भाजपने अनेक आप आमदारांशी लाच आणि पक्षांतराला प्रवृत्त करण्याच्या धमक्मया देऊन संपर्क साधल्याचा दावा केला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article