महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खलिस्तानी दहशतवादी-गँगस्टर्स विरोधात ईडीची कारवाई

06:14 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जयपूर :

Advertisement

खलिस्तानी दहशतवादी आणि त्यांच्याशी संबंधित गँगस्टर्सच्या कनेक्शन प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. ईडीने मंगळवारी राजस्थान आणि हरियाणातील 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि काला जठेडी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने कारवाई केली आहे. तुरुंगात कैद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि काला जठेडीच्या अनेक हस्तकांचे खलिस्तानी समर्थकांशी संबंध आहेत. मनी लॉन्ड्रिंगशी निगडित कनेक्शनचा पर्दाफाश करण्यासाठी ईडीकडून हे छापे टाकण्यात आले आहेत.

Advertisement

हरियाणा पोलिसांनी सुरेंद्र उर्फ चीकू तसेच त्याच्या टोळीच्या विरोधात अपहरण, हत्या, खंडणीवसुली आणि शस्त्र अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हे नोंदविले होते. तसेच एनआयएने याप्रकरणी दहशतवादी कारवायांची चौकशी केली आहे. सुरेंद्र उर्फ चीकू विरोधात हरियाणा पोलिसांच्या एफआयआरच्या आधारावर ईडीने पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. सुरेंद्र चीकूचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि खलिस्तानी दहशतवादी गटांशी आहे. बिश्नोई टोळी आणि खलिस्तानी गटांचा पैसा तो हाताळतो.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article