For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीवा माईन्स अँड मिनरल्स विरोधात इडीची कारवाई

10:45 AM Feb 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
जीवा माईन्स अँड मिनरल्स विरोधात इडीची कारवाई
Advertisement

पणजी : लोहखनिजाच्या खाणीतून भरमसाठ पैसा मिळविण्याचे स्वप्न दाखवून विदेशी  कंपन्यांना कोट्यावधी ऊपयांचा गंडा घालणाऱ्या ‘जीवा माइन्स अँड मिनरल्स लिमिटेड’ आता इडीच्या जाळ्यात अडकली आहे. गोव्याच्या आर्थिक गुन्हा विरोधी विभागाने सुरू केलेल्या तपासाची सूत्रे हाती घेत, इडीच्या पणजी विभागीय कार्यालयाने या प्रकरणातील सुमारे 2 कोटी 29 लाख ऊपयांच्या तीन स्थावर मालमत्तांवर तात्पुरती जप्ती आणली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत  ही कारवाई करण्यात आली असून, यात संशयितांनी चिनी कंपनीची तब्बल 13 कोटी 42 लाख ऊपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

Advertisement

2010 मध्ये ‘जीवा माइन्स’च्या मालकांनी चीनस्थित ‘मेसर्स लाओ टिंग दादी मोबाईल कंपोनंट्स’ नावाच्या कंपनीला खाण कामात भागीदारी करण्याचे आमिष दाखवले. आपल्याकडे खाणींचे मालकी हक्क आहेत आणि आपण लोहखनिजाची मोठी निर्यात करू शकतो, अशा आश्वासनांच्या जोरावर त्यांनी या कंपनीला भुरळ घातली. या भुलथापांना बळी पडून, संबंधित कंपनीने सुमारे 2.95 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 13.42 कोटी ऊपये) ‘जीवा माइन्स अँड मिनरल्स लिमिटेड’ला गुंतविले, मात्र पैसे हातात पडताच खाणकामाचे आणि निर्यातीचे स्वप्न फसले. प्रत्यक्षात ना जमिनीखाली उत्खनन झाले, ना बंदरावरून जहाजे सुटली. पैसे गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला. कारण लोहखनिज नाही तर पैसे परत करायला हवे होते, मात्र सर्व पैसा संशयितांनी अतिशय पद्धतशीरपणे स्वत:च्या सुखसोयींसाठी आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळविला, असे इडीच्या तपासातून उघड झाले आहे.

त्या रकमेतून संशयितानी मुंबई आणि सिंधुदुर्गात आपल्या नावे जमिनी घेतल्या असल्याचेही उघड झाले आहे. इडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये सिंधुदुर्ग जिह्यातील सावंतवाडी येथील गाळेल येथील दोन जमिनींचे भूखंड आणि मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील एका आलिशान निवासी फ्लॅटचा समावेश आहे. या मालमत्ता ‘गुह्यातून मिळालेल्या पैशातून खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गोव्याच्या आर्थिक गुन्हा विरोधी विभागाने यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपपत्र दाखल केले होते, त्याचा आधार घेत इडीने आता ही मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.