For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संसदेत आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडणार

06:55 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
संसदेत आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडणार
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

यावर्षीचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल गुरुवार, 29 जानेवारी रोजी सादर होणार आहे. दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्पापूर्वी संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर केला जातो. आर्थिक सर्वेक्षणात देशातील सर्व आर्थिक घडामोडी, उपलब्धी आणि भविष्यातील दृष्टिकोनाची सविस्तर माहिती दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवशी राष्ट्रपतींचे अभिभाषण झाल्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आले. आता यंदाचा अर्थसंकल्प रविवार, 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवालातून सरकारच्या कामगिरीची रुपरेषा मांडली जाणार आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारी ते 2 एप्रिल या कालावधीत चालणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी आणि दुसरा टप्पा 9 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत होणार आहे. या काळात एकूण 30 बैठका होतील. अर्थसंकल्प सादरीकरणादिवशी 1 फेब्रुवारी रोजी शून्य तास होणार नसल्याचे संसदीय कार्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. अर्थसंकल्प मांडल्यानंतर पुढील आठवड्यात संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होणार असल्याचेही सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.