240 ग्रॅमपेक्षा अधिक भाज्या खाल्ल्यास कॅन्सरचा धोका कमी
नव्या संशोधनात खुलासा
भोजनात भाज्यांचे अत्यंत महत्त्व आहे. भाज्या उत्तमप्रकारे तयार न करण्यात आल्यास सर्व चव बिघडून जाते. भाज्यांनी युक्त आहार शरीराला गंभीर आजारांपासून वाचवितो. एका अध्ययनानुसार पुरेशा प्रमाणात भाज्या खाल्ल्याने यकृताच्या कॅन्सरचा धोका 65 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
फ्रान्सच्या राष्ट्रीय आरोग्य तसेच चिकित्सा संशोधन संस्थेच्या संशोधकांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या अध्ययनात सिरोसिसने पीडित रुग्णांवर संशोधन करण्यात आले. या रुग्णांमध्ये भाज्या अन् फळे खाण्याच्या लाभांची तपासणी करण्यात आली.
विश्लेषण करण्यात आलेल्या 179 रुग्णांपैकी 20 जणांना हेपेटोसेलुलर कार्सिनोमा (लिव्हर कॅन्सर) असल्याचे निदान झाले. सिरोसिने पीडित 42.5 टक्के रुग्ण फळे आणि भाज्यांचे पुरेशा प्रमाणात सेवन करत नव्हते असे टीमला आढळून आले. संशोधकांनी 240 ग्रॅमपेक्षा अधिक भाज्या खाणारे सिरोसिसने पीडित रुग्णांमध्ये लिव्हर कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये 65 टक्क्यांची कमी दिसून आली असल्याचे सांगितले.
सिरोसिसच्या रुग्णांमध्ये फळे आणि भाज्यांचे सवेन अन् हेपेटोसेलुलर कार्सिनोमाच्या जोखिमेसंबंधी योग्य पद्धतीने माहिती उपलब्ध करविण्यात आलेली नाही. हेपेटोसेलुलर कार्सिनोमाच्या प्रतिबंधात अशाप्रकारची माहिती अत्यंत उपयुक्त ठरु शकते असे टीमने म्हटले आहे. यासंबंधीचे संशोधन जेएचईपी नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहे.
लिव्हर कॅन्सरचे प्रमाण अधिक
लिव्हर कॅन्सर होण्याचे प्रमाण तुलनेत अधिक आहे. याचे मुख्यत्वे हेपेटोसेलुलर कार्सिनोमाकडून प्रतिनिधित्व केले जाते, जे जवळपास 85-90 टक्के आहे. लिव्हरवर ट्यूमर वाढल्यावर हा आजार होतो. हेपेटोसेलुलर कार्सिनामा हा क्रोनिक लिव्हर रोग असलेल्या लोकांमध्ये सर्वाधिक असतो. क्रोनिक लिव्हर रोगाचे मुख्य कारण मद्यपान आणि व्हायरल हेपटायटिस आहे, तर यात अधिक वजन आणि स्थुलत्व, दूषित खाद्यपदार्थांचे सेवन देखील सामील आहे.