कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिवाळीला खा सर्वात महाग मिठाया

06:12 AM Oct 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दीपावलीचा सण आणि मिठाई किंवा गोड पदार्थ यांचे नाते अतूट आहे. या सणात जितकी मिठाई रिचवली जाते, तितकी अन्य कोणत्याही सणात क्वचितच खाल्ली जात असेल. ज्यांना गोड खाण्याला प्रतिबंध आहे, असे लोकही या सणात थोडेसे गोड तरी तोंडात टाकतातच. मिठाईच्या पदार्थांच्या दराचा मात्र विचार करावा लागतो. ज्यांच्यात महाग मिठाई खायची हौस आणि क्षमता आहे, त्यांच्यासाठी पुढील पदार्थ आदर्श ठरतील असे काही खवय्यांचे मत आहे.

Advertisement

Advertisement

  1. द एक्झोटिका- छप्पन भिन्न भिन्न पदार्थांपासून निर्माण होणारी मिठाई 50 हजार रुपये किलो या दराने मिळते. ती उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे निर्माण केली जाते. या मिठाईत अमेरिका, ब्रिटन ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये मिळणारे मौल्यवान खाद्यपदार्थही असतात. ही मिठाई निर्यात केली जाते.
  2. गोल्ड घारी- सुरत येथील एका कल्पक मिठाई निर्मात्याने निर्माण केलेली ही मिठाई अतिशय लोकप्रिय आहे. तिची किंमत 9 हजार रुपये प्रतिकिलो आहे. बानवकशी सोन्याचे वर्ख या मिठाईला लावलेले असते. ती अतिशय पौष्टिक आहे असे तिच्या निर्मात्याचे म्हणणे आहे. ही मिठाईही निर्यात केली जाते.
  3. बेसन लाडू- हे सर्वसामान्य किंवा नेहमीचे बेसन लाडू नसून वेगळ्या प्रतीचे असतात. त्यांची किंमत 21 हजार रुपये ते 31 हजार रुपये प्रतिकिलो अशी आहे. ते दिल्लीच्या एका मिठाईगृहात बनतात. या लाडूंमध्ये फ्रान्समध्ये मिळणारे व्हॅलरहोना चॉकलेट आणि सोन्याची खाण्यायोग्य भुकटीही असते.
  4. सुवर्ण मिठाई- या मिठाईची निर्मिती महाराष्ट्रातील ठाणे येथे होते. तिची किंमत 9 हजार रुपये किलो इतकी आहे. या मिठाईत मार्मा बदाम, उच्च प्रतीचे पिस्ते आणि शुद्ध काश्मीरी केशर असते. ही मिठाईही अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट असल्याचे तिच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. ती निर्यात केली जाते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article