इस्ट बंगालचा एकतर्फी विजय
वृत्तसंस्था/कोलकाता
134 व्या ड्युरँड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत इमामी इस्ट बंगाल एफसी संघाने अ गटातील सामन्यात इंडियन एअरफोर्स संघाचा 6-2 अशा गोलफरकान sएकतर्फी पराभव केला. या विजयामुळे इस्ट बंगालने अ गटातून आघाडीचे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत अ गटामध्ये आता इस्ट बंगालचा संघ आघाडीव असून त्यांनी आपले तीन्ही सामने जिंकले आहेत. येथील किशोरी भारती क्रीडांगणावर झालेल्या या सामन्यांत इस्ट बंगाल संघामध्ये पाच बदल करण्यात आले होते. इस्ट बंगाल संघातील अन्वर आणि एहादाद यांनी पहिल्या पाच मिनिटांच्या कालावधीत इंडियन एअरफोर्सच्या गोलपोस्टच्या दिशेने एडरद्वारे मारलेले फटके इंडियन एअरफोर्सच्या गोलरक्षकाने थोपविला. मात्र सातव्या मिनिटाला इस्ट बंगालचे खाते एहदादने उघडले. एहदादने 13 व्या मिनिटाला मारलेला फटका गोलपोस्टच्या बाहेरुन गेल्याने इस्ट बंगालला आपली आघाडी वाढविता आली नाही.
25 व्या मिनिटाला बिपीन सिंगने इस्ट बंगालचा दुसरा गोल केला. 36 व्या मिनिटाला अमन खानने इंडियन एअरफोर्सचा एकमेव गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत इस्ट बंगालने 2-1 अशी आघाडी घेतली होती. 63 व्या मिनिटाला इस्ट बंगालचा तिसरा गोल डेव्हिड हेमरने केला. 68 व्या मिनिटाला इस्ट बंगालचा चौथा गोल बशीमने नोंदविला. इस्ट बंगालचा पाचवा गोल 85 व्या मिनिटाला क्रेस्पोने एडमनच्या पासवर नोंदविला. मिगेलने हेडरद्वारे दिलेल्या पासवर बदली खेळाडू डेव्हिड हेमरने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा सहावा गोल नोंदवून इंण्डियन एअरफोर्सचे आव्हान संपुष्टात आणले. इस्ट बंगाल संघाने प्राथमिक फेरीमध्ये आपले तिन्ही सामने जिंकून आघाडी घेतली आहे. तर इंडियन एअरफोर्स संघाने तीन सामन्यांतून केवळ एक गुण मिळविला आहे.