महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये भूकंपाचे धक्के

06:44 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रता

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

भारत आणि पाकिस्तान सीमेवर शुक्रवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. काश्मीरच्या बारामुल्लामध्ये दुपारी सुमारे 12.26 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे घाबरलेल्या लोकांनी घरांबाहेर धाव घेतली होती. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.1 इतकी होती. भूकंपाचे केंद्र जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होते अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. सध्या या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही.

मागील काही काळापासून हिमालयीन क्षेत्रात भूकंपाचे अनेक धक्के जाणवले आहेत. यामुळे लोकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी हिमाचलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. तर काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article