For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडू परिसरात 3.0 तीव्रतेचा भूकंप

06:23 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडू परिसरात 3 0 तीव्रतेचा भूकंप
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

तामिळनाडूतील विरुधुनगर, श्रीविलीपुथूर आणि आसपासच्या भागात गुरुवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, विरुधुनगर आणि आसपासच्या भागात रात्री 9:06 वाजता 3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू कोचीच्या आग्नेयेस 167 किलोमीटर आणि तिरुचिरापल्लीच्या नैर्त्रुत्येस 185 किलोमीटर अंतरावर, जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. भूकंपानंतर स्थानिक रहिवासी घराबाहेर पडून मुख्य रस्त्यावर व मोकळ्या मैदानावर जमले होते. दरम्यान, रहिवाशांनी आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर करत भूकंपाची माहिती व्हायरल केली. रात्री 9:06 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती भूकंपांवर लक्ष ठेवणारी सरकारी संस्था असलेल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अधिकाऱ्याने देत यासंबंधीच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला.

Advertisement
Advertisement
Tags :

.