चीन, अफगाणिस्तानसह पाकिस्तानमध्येही भूकंप
12:57 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ बीजिंग
Advertisement
तिबेटमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर शुक्रवार, 23 ऑक्टोबर, 2026 रोजी पहाटे अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तानमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, या तिन्ही देशांमधील भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 4.1, 4.4 आणि 4.9 इतकी होती. अफगाणिस्तानमध्ये पहाटे 5:54 वाजता 4.1 तीव्रतेचा भूकंप झाला. तर पाकिस्तानमध्ये पहाटे 4:56 वाजता 4.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या हादऱ्यांची नोंद झाली. चीनमध्ये पहाटे 6 वाजून 05 मिनिटांनी 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला. यापूर्वी गुरुवार, 22 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजून 3 मिनिटांनी तिबेटमध्ये 7.0 तीव्रतेचा एक जोरदार भूकंप जाणवला होता.
Advertisement
Advertisement
