पृथ्वीकडे असू शकतात अनेक ‘मिनीमून’
वैज्ञानिकांनी शोधला छोटा चंद्र 2024 पीटीएस
पृथ्वीच्या आसपास छोटे-छोटे खडकाळ तुकड्यांची एक मोठी संख्या असू शकते, ज्यांना ‘मिनीमून’ म्हटले जाते. अलिकडेच शोधण्यात आलेला 2024 पीटीएस नावाचा छोटा खडकाळ तुकडा मागील वर्षी मिनीमून म्हणून घोषित करण्यात आला, तो बहुधा चंद्रापासून तुटून वेगळा झाला असावा असे सांगण्यात येत आहे.
हा तुकडा लाखो वर्षांपूर्वी चंद्रावर एखाद्या मोठ्या टक्करीमुळे (इम्पॅक्ट) अंतराळात आला असावा. हा शोध पृथ्वीनजीक चंद्राचे असे अनेक तुकडे फिरत असावेत याचा संकेत देतो. जर केवळ एक असा तुकडा असता तर हे रंजक ठरले होते, परंतु हे एकमेव प्रकरण नाही. आता दोन तुकडे मिळाले असून ही एक मोठी संख्या असू शकते असा आम्हाला विश्वास असल्याचे प्लॅनेटरी सायंटिस्ट टेडी करेटा यांनी टेक्सास येथे झालेल्या 56 व्या लूनर अँड प्लॅनेटरी सायन्स कॉन्फरन्सला संबोधित करताना म्हटले आहे.
2024 पीटीएसचा शोध ऑगस्ट 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या खगोलशास्त्रज्ञांनी लावला हाता. हा तुकडा पृथ्वीजवळ अत्यंत मंद गतीने केवळ 7.24 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने (2 मीटर प्रति सेकंद) फिरत होता. इतक्या मंद वेगाने फिरणारे केवळ नऊ अन्य सूक्ष्मग्रह (एस्टेरॉयड) यापूर्वी पाहिले गेले आहेत. याच्या शोधानंतर टेडी करेटा आणि त्यांचे सहकारी निक मॉस्कोविट्ज यांनी याचे लोवेल डिस्कव्हरी टेलिस्कोपद्वारे अध्ययन केले.
चंद्राचा तुकडा का मानला गेला?
संशोधकांनी 2024 पीटीएस अध्ययनात हा साधारण सुक्ष्मग्रह नसल्याचे सांगितले. याची संरचना अपोलो मिशन आणि सोव्हियत युनियनच्या लूना 24 मिशनकडून चंद्रावरून आणले गेलेल्या दगडांसारखी आहे. हा तुकडा केवळ 8-12 मीटरचा आहे, म्हणजेच अत्यंत छोटा आहे. 2024 पीटीएसची निर्मीत चंद्रावर एखादा मोठा पिंड धडकल्यावर झाली असावी असे संशोधकांचे मानण आहे. या धडकेमुळे चंद्राचा काही हिस्सा तुटून अंतराळात पोहोचला. संशोधक या तुकड्याच्या संरचनेचे अध्ययन करून हा चंद्राच्या कुठल्या ख•dयातून (क्रेटर)आला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
चंद्रासारख्या उपग्रहांवर टेक्टोनिक प्लेट्स तसेच तरल पदार्थ नसतात, तेथे क्रेटर निर्माण होणे सर्वात महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे, परंतु टक्कर समजून घेणे अवघड ठरू शकते, कारण यात अनेक गोष्टी सामील असतात. अंतराळात चद्रांच्या तुकड्यांना त्यांच्या क्रेटरशी जोडले गेल्यास वैज्ञानिकांना टक्करदरम्यान काय घडले असावे हे समजून घेण्यास मदत होणार आहे.
2024 पीटीएस मिनीमून
पृथ्वी सूर्याला प्रदक्षिणा घालताना धूळ, दडग अन् अंतराळाच्या कचऱ्याचे ढग घ्रान फिरते, यात काही मानवनिर्मित गोष्टी म्हणजेच उपग्रह आणि अंतराळ कचराही सामील आहे, परंतु काही खडकाळ तुकडे सौरमंडळाच्या प्रारंभिक काळात झालेल्या टक्करांमुळे निर्माण झाले आहेत. त्यांना नियर-अर्थ ऑब्जेक्ट्स म्हटले जाते, हे पृथ्वीसाठी धोका ठरू नयेत म्हणून त्यांच्यावर नजर ठेवली जात असते.
2024 पीटीएसल सप्टेंबर 2024 मध्ये मिनीमून म्हटले गेले कारण हा काही काळासाठी पृथ्वीसोबत फिरत राहिला. टेडी करेटा या प्रकाराची तुलना महामार्गावर धावणाऱ्या दोन वाहनांशी करतात. पृथ्वी स्वत:च्या मार्गिकेत वेगाने फिरत आहे, तर 2024 पीटीएस मंदगतीने सूर्यानजीकच्या मार्गिकेत होता. 2024 मध्ये तो पृथ्वीच्या मार्गिकेत आला आणि काही काळ सोबत फिरत राहिला. सप्टेंबरच्या अखेरीस तो पुन्हा स्वत:च्या मार्गिकेत शिरला. 2055 मध्ये तो पुन्हा पृथ्वीच्या नजीक येणार असल्याचा अनुमान आहे.
यापूर्वीही मिळाला होता असा तुकडा
2024 पीटीएस चंद्राचा दुसरा तुकडा आहे जो वैज्ञानिकांनी शोधला आहे. यापूर्वी 2016 मध्ये शोधण्यात आलेला ‘कामो ओलेवा’ नावाचा तुकडा देखील 2021 मध्ये चंद्राशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले होते. कामो ओलेवा आकाराने मोठा असून अंतराळात कॉस्मिक किरणे आणि सौर विकिरणांमुळे त्याचे अधिक नुकसान झाले आहे. कामो ओलेवा एक क्वासी-सॅटेलाइटप्रमाणे आहे, जो पृथ्वीच्या नजीक अनेक फेऱ्या मारत असता. परंतु तो चहुबाजूला फिरत नाही.