For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Railway Division | भंगार विकले अन् कोट्यधीश झाले,सोलापुर रेल्वे विभागाची कहाणी काय?

05:41 PM Jun 10, 2026 IST | NEETA POTDAR
solapur railway division   भंगार विकले अन् कोट्यधीश झाले सोलापुर रेल्वे विभागाची कहाणी काय
Advertisement

Advertisement

सोलापूर -मध्य रेल्वेच्या 'मिशन-झिरो स्क्रैप स्टेटस' या विशेष उपक्रमांतर्गत सोलापूर विभागाने एप्रिल व मे २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत भंगार विक्रीतून ४ कोटी ५९ लाख रुपयांचा महसूल मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पर्यावरण संवर्धन, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेला सोलापूर विभागानेही प्रभावीप्रतिसाद दिला आहे. मध्य रेल्वेने एप्रिल व मे २०२६या कालावधीत एकूण ७३.६७कोटी रुपयांची विक्रमी भंगार विक्री केली असून त्यामध्ये सोलापूर विभागाचे ४.५९ कोटी रुपयांचे योगदान आहे.

Advertisement

रेल्वे परिसरातील पडून असलेले विविध प्रकारचे भंगार, लोहयुक्त व अलोहयुक्त साहित्य, जुने स्लीपर्स तसेच वापरात नसलेली रेल्वे सामग्री यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून हा महसूल प्राप्त करण्यात आला.'मिशन-झिरो स्क्रैप स्टेटस' अंतर्गत रेल्वेच्या मालकीच्या वापरात नसलेल्या जागा व साहित्याची ओळख पटवून त्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात आले. यामुळे रेल्वे परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनण्यास मदत झाली आहे.

तसेच भंगाराचे पुनर्चक्रण झाल्याने पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागला आहे. मध्य रेल्वेच्या पाचही विभागांमध्ये आणि कार्यशाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. भंगार विक्रीत पुणे विभाग प्रथम क्रमांकावर असला तरी सोलापूर विभागानेही ४.५९ कोटी रुपयांचा महसूल मिळवून आपल्या कार्यक्षमतेची छाप पाडली आहे.

Advertisement
Tags :

.