For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केवळ मेणबत्तीद्वारे कमाविले ६३ कोटी

11:02 AM Apr 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
केवळ मेणबत्तीद्वारे कमाविले ६३ कोटी
Advertisement

चीनमध्ये महिलेचा जादूटोण्याचा धंदा

Advertisement

चीनच्या एका इन्फ्लुएंसरला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. कारण तिने डेकोरेटेड मेणबत्तींना ‘विश कँडल्स’ ठरवत विकले आणि सुमारे 63 कोटी रुपये कमाविले आहेत. चीनचे तणावग्रस्त युवा ऑनलाइन अजब उत्पादने खरेदी करत ‘भावनात्मक आणि अध्यात्मिक दिलासा’ शोधत आहेत. अशास्थितीत तेथील युवा अशाप्रकारच्या फसवणुकींना सहजपणे बळी पडतात. अशाप्रकारची सामग्री जी वास्तविकतेला विकृत करू शकते आणि जादूटोण्यादाखल अंधश्रद्धाही फैलावते, त्यापासून युवांनी दूर राहण्याची गरज असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. चीनमध्ये काही युवा स्वत:चे प्रेम पुन्हा मिळविण्याकरता इन्फ्लुएंसर्सकडून विकण्यात येणाऱ्या मेणबत्त्यांसाठी मोठी किंमत मोजत आहेत.

ली झूओफान नावाच्या इफ्लुएंसरने रशियन रियलिटी शो ‘द बॅटल ऑफ साइकिक्स’मध्ये आल्यावर चीनच्या सोशल मीडियावर 6 लाखाहून अधिक फॉलोअर्स जमविले, जेथे तिने एका मेणबत्तीचा वापर करत लपलेल्या व्यक्तीचा शोध लावला आणि कुणासोबत पुढील काळात काय घडू शकते याची जाणीव करू शकते असा दावा केला. चीनमध्ये परतल्यावर लीने ऑनलाइन हस्तनिर्मित मनोकामना मेणबत्त्या (विश कँडल्स) विकण्यास सुरुवात केली. या मेणबत्त्यांना क्रिस्टल आणि सुकलेल्या फुलांनी सजविण्यात येत होते आणि यात आवश्यक तेलांचे मिश्रण असायचे. तिने वेगवेगळ्या मिश्रणांना वेगवेगळ्या शक्तींनी युक्त असल्याचे सांगत मार्केटिंग सुरु केले. यात करियर अन् संपत्ती वाढण्यापासून पूर्वाश्रमीच्या प्रेयसी किंवा प्रियकराला परत आणणाऱ्या मेणबत्ती जादूटोण्याच्या रुपात विकू लागली.

Advertisement

एक लाख रुपयात एक मेणबत्ती

अशाप्रकारच्या एका मेणबत्तीची किंमत 2888 युआन म्हणजेच 38 हजार रुपयांपासून सुरू होत एक लाख रुपयांपर्यंत होती. या मेणबत्तींमध्ये ‘ट्रिपल लक’ वर्जन सारखे विश कँडलही होते. लीने स्वत:च्या मानसिक क्षमतेला मजबूत करणारे व्हिडिओ तयार करणे आणि पोस्ट करण्यासाठी एक टीमही कामावर ठेवली होती आणि मेणबत्तींसोबत ऑनलाइन भविष्यवाणीही विकली होती. एका ग्राहकाने 5888 युआन खर्च करत मेणबत्तीद्वारे आपल्या दुकानावर अधिक ग्राहक येतील अशी अपेक्षा केली होती. परंतु कुठलाच फरक न पडल्यावर त्याने पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर ली हिला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

विश कँडल्स आणि संबंधित मानसिक अभ्यासक्रमांच्या विक्रीतून 63 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. चीनच्या कायद्यानसार विशेष स्वरुपात मोठ्या रकमेशी निगडित फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये दंड आणि संपत्ती जप्त करण्यासोबत 10 वर्षांपेक्षा अधिक कालावधीची शिक्षा होऊ शकते.

अद्याप या मेणबत्त्यांची मोठी मागणी

हे प्रकरण समोर आल्यावरही मनोकामना पूर्ण करणाऱ्या मेणबत्त्यांशी संबंधित पोस्ट आणि शॉपिंग लिंक सोशल मीडियावर प्रसारित होत राहिले. काही युजर्सनी तर प्रेमाची मेणबत्ती पेटविल्यावर माझी पूर्वाश्रमीची प्रेयसी पुन्हा सोबत आल्याचा दावा केला. तर काही लोकांनी मेणबत्ती पेटविण्याचा कालावधी आणि लोकांचे बदल पाहण्याचा आग्रह केला.

मोठी क्रेझ

विश कँडल्सची क्रेझ चीनच्या अध्यात्मिक अर्थव्यवस्थेत आहे. मेणबत्त्यांसोबत क्रिस्टल, टॅरो रीडिंग आणि स्प्रिच्युअल रेस्टच्या स्वरुपात प्रसारित होत असलेली अनेक उत्पादने सामील आहेत. याच्या तडाख्यात युवा पिढी आली असून ती दबावात आहे. विक्रेते, लाइव्ह-स्ट्रीमिंग, सोशल मीडिया आणि एआय तंत्रज्ञानाद्वारे त्यांची फसवणूक करत आहेत.

Advertisement
Tags :

.