For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतात इलेक्ट्रॉनिक कचरा 163 टक्क्यांनी वाढला

06:34 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतात इलेक्ट्रॉनिक कचरा 163 टक्क्यांनी वाढला
Advertisement

युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन  ट्रेड अॅण्ड डेव्हलपमेंट (ळहम्tad) अहवालामधून माहिती उघड

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उर्वरित जगाच्या तुलनेत भारतात इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात मोठी वाढ झाली आहे. ही वाढ जवळपास 163 टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहिती अलीकडेच, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट (ळहम्tad) डिजिटल इकॉनॉमी रिपोर्ट 2024 या अहवालात दिली आहे. यात म्हटले आहे की 2010 ते 2022 दरम्यान, क्रीन, कॉम्प्युटर आणि लहान आयटी आणि टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट (एससीएसआयटी) पासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण अधिक राहिले आहे.

Advertisement

‘शेपिंग एन एन्व्हायर्नमेंटली सस्टेनेबल अँड इनक्लुसिव्ह डिजिटल फ्युचर’ अहवालात असे नमूद केले आहे की जागतिक एससीएसआयटी कचरा निर्मितीमध्ये भारताचा वाटा 2010 मध्ये 3.1 टक्क्यांवरून 2022 मध्ये 6.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. 2022 मध्ये आशियातील विकसनशील देश, ज्यामध्ये चीनचा वाटा अधिक आहे.

 इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या घातक परिणामांविषयी

विकसनशील देशांमध्ये डिजिटायझेशनमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या मोठ्या भागावर योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात नसल्याचे मत नोंदवण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘डिजिटलायझेशन कचऱ्यामध्ये घातक पदार्थ असतात आणि योग्य प्रकारे प्रक्रिया न केल्यास त्याचा पर्यावरणावर तसेच मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यात जड धातू आणि आर्सेनिक, कॅडमियम, शिसे आणि पारा यांसारखे विषारी पदार्थ होते.’

5जी ग्राहकांची वाढती संख्या

याशिवाय, अहवालात म्हटले आहे की, 2023 मध्ये, ईशान्य आशियामध्ये सुमारे एक तृतीयांश जागतिक मोबाइल डेटा तयार केला जाईल आणि पुढील सर्वात मोठा वाटा भूतान, भारत आणि नेपाळ सारख्या देशांमधून येईल. अहवालानुसार, 2029 च्या अखेरीस जगभरात 5 जी ग्राहकांची संख्या 5 अब्जपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. हे सर्व मोबाईल ग्राहकांच्या सुमारे 60 टक्के आहे. ही वाढ प्रामुख्याने ईशान्य आशिया, विशेषत: चीनमधून होईल आणि त्यानंतर भारतही यामध्ये मोठा वाटा उचलेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

डेटा केंद्रांची उभारणी

अहवालात असे नमूद केले आहे की आशिया आणि पॅसिफिक प्रदेशातील एकूण डेटा सेंटर मार्केट जलद डिजिटलायझेशन आणि क्लाउड-आधारित सेवांच्या वाढत्या मागणीसह 2024 पर्यंत 28 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते. डेटा केंद्रांच्याबाबतीत चीन आघाडीवर असेल, त्यानंतर भारत आणि सिंगापूरचा क्रमांक लागतो.

भारताच्या प्रयत्नांचे कौतुक

अहवालात म्हटले आहे की, ‘अमेझॉन इंडियाने सिंगल यूज प्लास्टिक पूर्णपणे काढून टाकण्यासाठी पावले उचलली आहेत. यामध्ये बबल रॅप आणि एअर पिलोज सारख्या प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियलचे कागदी कुशनमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. भारतीय डिलिव्हरी कंपनी जीप इलेक्ट्रिकने वस्तूंच्या वितरणासाठी शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक वाहने आपल्या ताफ्यात समाविष्ट केली आहेत आणि शहरी केंद्रांमध्ये चार्जिंग नेटवर्कमध्ये गुंतवणूक केली आहे.

Advertisement
Tags :

.