For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

असंघटित कामगारांसाठी ‘ई-श्रम’ पोर्टल

03:13 PM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
असंघटित कामगारांसाठी ‘ई श्रम’ पोर्टल
Advertisement

कामगारांच्या सुरक्षेकडे पाऊल : प्रभावी धोरणे आखणे सुलभ : जिल्ह्यात 10 लाख कामगार

Advertisement

बेळगाव : देशातील असंघटित क्षेत्रातील कोट्यावधी कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यासाठी श्र्रम व रोजगार मंत्रालयाच्या पुढाकारातून ई-श्र्रम पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून असंघटित कामगारांचा एक केंद्रीकृत राष्ट्रीय डेटाबेस तयार केला जात असून यामुळे शासनाला कामगारांसाठी प्रभावी धोरणे आखणे अधिक सुलभ झाले आहे. राज्य असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळाच्यावतीने कामगारांसाठी विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत. या पोर्टलअंतर्गत जिल्ह्यात 10 लाख 13 हजार 183 कामगार कार्यरत आहेत.

देशात मोठ्या प्रमाणावर कामगार असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. या कामगारांना नियमित नोकरीचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा किंवा शासकीय योजनांचा लाभ सहजपणे मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन ई-श्र्रम पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. या पोर्टलवर सरकारने ओळखलेल्या तब्बल 406 प्रकारच्या असंघटित कामगारांची नोंदणी करता येते. यामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगार, शेतमजूर, मच्छीमार, आशा कार्यकर्त्या, घरगुती कामगार, चालक, शिंपी, रस्त्यांवरील विव्रेते आदी विविध घटकांचा समावेश आहे.

Advertisement

डेटाबेसमुळे धोरणांना गती

ई-श्र्रम पोर्टलवर नोंदणी झालेल्या कामगारांची माहिती एकत्रित केल्यामुळे शासनाला त्यांच्या गरजा, अडचणी आणि आर्थिक स्थितीचा अचूक अंदाज घेता येतो. या माहितीच्या आधारे कामगारांसाठी नवीन योजना तयार करणे, विद्यमान योजनांमध्ये सुधारणा करणे आणि त्यांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करणे शक्मय होते. त्यामुळे कामगारांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यास मदत होते.

नोंदणीचे प्रमुख फायदे

ई-श्र्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग खुला होतो. विशेषत: आपत्तीच्या काळात या डेटाचा मोठा उपयोग होतो. कोविड-19 महामारीच्या काळात अनेक कामगारांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत ई-श्र्रम डेटाबेसच्या माध्यमातून पात्र लाभार्थींची ओळख पटवून त्यांना थेट मदत पोहोचवणे शक्मय झाले होते. नोंदणीनंतर प्रत्येक कामगाराला एक युनिक ओळख क्रमांक (युएएन) दिला जातो. त्यामुळे कामगार कुठल्याही राज्यात स्थलांतरित झाला तरी त्याची ओळख कायम राहते आणि त्याला योजनांचा लाभ मिळण्यात अडथळा येत नाही.

पात्रता आणि अटी

या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी काही मूलभूत अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. कामगाराचे वय 18 ते 59 दरम्यान असणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती आयकर भरणारी नसावी तसेच ती भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) किंवा कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) योजनेचा लाभार्थी नसावी. या अटींमुळे खऱ्या अर्थाने असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नोंदणी प्रक्रिया सोपी आणि विनामूल्य

ई-श्र्रम पोर्टलवर नोंदणी करणे अत्यंत सोपे असून ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. कामगारांना www.ाsप्raस्.gदन्.ग्ह या संकेतस्थळावर जाऊन स्व-नोंदणी करता येते. ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया अवघड वाटते त्यांच्यासाठी ऑनलाईन सेंटर, बापूजी सेवा केंद्र, पोस्ट ऑफीस व ग्राम-वन केंद्रांमध्ये नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड व आधारला जोडलेला मोबाईल नंबर व बँक खाते तपशील देणे आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या आधारे नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तात्काळ यूएएन क्रमांक जारी केला जातो.

ग्रामीण-शहरी भागात जनजागृतीची गरज

ई-श्र्रम पोर्टलची उपयुक्तता मोठी असली तरी अनेक असंघटित कामगार अजूनही या योजनेपासून दूर आहेत. विशेषत: ग्रामीण भागात आणि अल्पशिक्षित कामगारांमध्ये या पोर्टलविषयी जागरुकतेचा अभाव दिसून येतो. त्यामुळे शासनाने आणि संबंधित संस्थांनी अधिक प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरू शकते.

संपर्क-मदत सुविधा

कामगारांना नोंदणीसंदर्भात किंवा इतर माहितीसाठी 155214 व 14434 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधता येतो. तसेच तक्रारी नोंदविण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ई-श्र्रम पोर्टल हे एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीचे पाऊल ठरत आहे. या उपक्रमामुळे कामगारांचे जीवनमान उंचावण्यासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. योग्य जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारे या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र कामगारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.