For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेब्बाळकरांकडून घराणेशाहीचे राजकारण

06:23 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
हेब्बाळकरांकडून घराणेशाहीचे राजकारण
Advertisement

माजी आमदार संजय पाटील यांची टीका : हिंडलग्यात प्रचार सभा

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

काँग्रेसच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या पक्ष वाढविण्यापेक्षा आपले कुटुंब राजकारणात कसे येईल, असे पाहत आहेत. स्वत: मंत्री, भाऊ विधान परिषद सदस्य आता मुलगा लोकसभेचा उमेदवार, त्यानंतर घरातील इतर सदस्यांनाही राजकारणात आणले जाईल तर मग कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? अशी टीका भाजपचे माजी आमदार संजय पाटील यांनी हेब्बाळकर यांच्या घराणेशाहीवर केली.

Advertisement

भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारार्थ शनिवारी हिंडलगा येथे झालेल्या सभेमध्ये काँग्रेस तसेच लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. हेब्बाळकर यांच्याकडून ग्रामीण भागातील महिलांना भीती घालण्याचे प्रकार सुरू आहेत. भाजपच्या सभेला अथवा प्रचाराला गेल्यास गृहज्योती योजना बंद करण्याची भीती दाखविली जात आहे. परंतु, हा पैसा सरकारचा नसून सर्वसामान्यांचा आहे. त्यामुळे कोणालाही न घाबरता भाजपलाच मतदान करा, असे संजय पाटील यांनी सांगितले.

या सभेला भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर, खासदार मंगला अंगडी, राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिल बेनके यांनीही काँग्रेसवर टीका करत मागील दहा वर्षात भाजपने राबविलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Advertisement
Tags :

.