डीवायईएसच्या ज्युडो संघाची राष्ट्रीय स्पर्धेत हॅट्ट्रिक
बेळगाव : दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या 19 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत डीवायईएस बेळगावच्या तीन ज्युडो खेळाडूंनी कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदकाची कमाई केली. सदर स्पर्धा 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान स्पंदना सी. एसा 40 किलो वजनी गटात श्वेता अलकनूर, 44 किलो वजनी गटात संगमेश मदली ा 55 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकविले, या स्पर्धेकांनी पंजाब, हरियाणा, मणिपूर, दिल्ली व जम्मू-काश्मीर या राज्यांतील खेळाडूशी भिडून डीवायईएसने राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदकांची कमाई केली. या विजेत्या खेळाडू नेहरूनगर येथील डीवायईएस इनडोअर हॉलमध्ये प्रशिक्षक घेत असून यांना एनआयएस प्रशिक्षक रोहिणी पाटील व कुतुजा मुलतानी यांच्या मार्गदर्शन लाभत आहे तर बेळगाव क्रिडा खात्याचे उपसंचालक श्रीनिवास बी. यांचे सहकार्य लाभत आहे.