महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेटलिफ्टींग स्पर्धेत डीवायईएसचे यश

09:43 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेंगळूर येथे राज्यस्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएसच्या वेटलिफ्टर्सनी 2 सुवर्ण, 7 रौप्य व 5 कास्य पदकासह घवघवीत यश संपादन केले आहे. बेंगळूर येथील कंटीरीव्वा इंडोर स्टेडियमवर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएसच्या वेटलिफ्टर्सने भाग घेऊन यश संपादन केले आहे. त्यामध्ये नक्षा पाटीलने ज्युनियर व सिनीयर गटात सुवर्ण व रौप्य पदकासह उत्कृष्ट लिफ्टर्सचा बहुमान मिळविला. चंद्रीका चांदीलकरने ज्युनी-सिनीयर गटात सुवर्ण व 1 रौप्य पदक, शशी गौंडाडकरने युथ गटात रौप्य, रितीका बांडगीने युथ गटात रौप्य, रोनिता मुरकूटेने रौप्य पदक, पारिखा पाटीलने ज्युनियर गटात रौप्य पदक, क्रिस्टन एस.ने युथ गटात कास्य, वैभवी दळवीने ज्युनियर गटात कास्य, ज्ञानेश्वरी बेकेनकेरीने युथ गटात कास्यपदक पटकाविले. यांना युवजन क्रीडा खात्याचे वेटलिफ्टींग प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी, रमेश अलगुडगेकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन, युवजन क्रीडाधिकारी बी. श्रीनिवास, संघ व्यवस्थापक पूजा संताजी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article